विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं? खऱ्या आयुष्यातील 'मंजिरी'बद्दल अभिनेता पहिल्यांदाच बोलला, म्हणतो-"दोघांनीही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:32 IST2025-11-25T13:16:50+5:302025-11-25T13:32:11+5:30
विशाल निकमची खऱ्या आयुष्यातील मंजिरीबद्दल प्रतिक्रिया, म्हणाला-"साता जन्माच्या गाठी..."

विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं? खऱ्या आयुष्यातील 'मंजिरी'बद्दल अभिनेता पहिल्यांदाच बोलला, म्हणतो-"दोघांनीही..."
Vishal Nikam: अभिनेता विशाल निकम हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. विशाल सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेत मुख्य भूमिका साकारतो आहे. या मालिकेत तो राया नावाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. तर अभिनेत्री पूजा बिरारीने साकारलेली मंजिरी सुद्धा प्रेक्षकांना भावली आहे. सध्या मालिकेत राया-मंजिरीच्या लग्नाचा सिक्वेंस पाहायला मिळतोय. याचनिमित्ताने विशाल आणि पूजा माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत.
नुकतीच विशाल निकम आणि पूजा बिरारीने 'अल्ट्रा बझ' मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, राया अर्थात विशाल निकमला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी अभिनेत्याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील मंजिरीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यादरम्यान, रिअल लाईफमधील मंजिरीला किती कन्व्हिंन्स करावं लागलं, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "मला वाटतं आमच्यामध्ये सगळं जुळून आलं,गोष्टी घडत गेल्या. दोघांनीही फार मेहनत घेतली नाही, पण ते घडत गेलं. वरच साता जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या होत्या." अशी प्रतिक्रिया देत विशालने रिअल लाईफमधील मंजिरीबद्दल हिंट दिली आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांपासून विशाल निकम अभिनेत्री अक्षया हिंदळकरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. विशाल निकम आणि अक्षयाने 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचं सुंदर नातं निर्माण झालं.मात्र, त्यांनी आपलं नातं जाहिर केलेलं नाही.
अभिनेता विशाल निकमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता.