सहजीवनाची ८ वर्षे! 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील अधिपतीची खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:44 IST2025-05-30T18:41:47+5:302025-05-30T18:44:00+5:30

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील अधिपतीची खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंसाठी पोस्ट, म्हणाला...

marathi television actor tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar shared special post for his wife on the occasion of his wedding anniversary | सहजीवनाची ८ वर्षे! 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील अधिपतीची खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंसाठी पोस्ट

सहजीवनाची ८ वर्षे! 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील अधिपतीची खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंसाठी पोस्ट

Hrishikesh Shelar: 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'सुंदरा मनामध्ये भरली' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हृषिकेश शेलार(Hrishikesh Shelar). अलिकडेच तो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत त्याने साकारलेला अधिपती प्रेक्षकांना प्रचंड भावला. आता ही मालिका ऑफ एअर झाली आहे. अशातच नुकतीच हृषिकेशने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट लिहून शेअर केली आहे.


 

हृषिकेशने शेलारने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "८ वर्ष झाली या प्रवासाला..., Happy anniversary..., अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टला रिप्लाय देत त्याच्या पत्नीने म्हटलंय, "८ वर्ष झाली या प्रवासाला..., आजच्या युगातले आपण पण तरीही ९० च्या दशकात रमणारे... ८० आणि ७० च्या दशकातली गाणी आपल्या फार जवळची...ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांबरोबर असंच कलरफुल आयुष्य जगूया हृषी... आणि आता तर रुहीच्या अवतीभवती फिरतंय आपलं आयुष्य...अशीच एकमेकांना साथ देत, बुस्ट करत, सुंदर आयुष्य एकमेकांसोबत घालवूया..." म्हणत अभिनेत्री स्नेहा अशोक मंगल हिने हृषीकेश शेलारला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


दरम्यान, सध्या सोशल मीडियालर हृषिकेश शेलारने लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: marathi television actor tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar shared special post for his wife on the occasion of his wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.