नवं घर, नवा आनंद…! 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्याची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती, दाखवली खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:29 IST2025-10-24T13:25:22+5:302025-10-24T13:29:20+5:30
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने पुण्यात घेतलं हक्काचं घर, शेअर केली खास झलक

नवं घर, नवा आनंद…! 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्याची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती, दाखवली खास झलक
Marathi Actor Buy New Home: दिवाळीचा सण म्हणजे खरेदीचा उत्सवच असतो. या आनंददायी सणामध्ये अनेकजण नव्या गोष्टी खरेदी करतात. काहीजण नवीन गाडी, दागिने खरेदी करताना दिसतात. तर काहीजण दिवाळीनिमित्त नवीन घर देखील घेतात. त्यात कलाकार मंडळी देखील कुठे मागे नाही. नुकतंच मराठी अभिनेत्री अनुजा साठे हिनं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवं घर घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने नवं घर घेत स्वप्न साकार केलं आहे.
स्टार प्रवाहवरील 'लग्नाची बेडी' मालिकेतील वृषभ रत्नपारखी म्हणजेच अभिनेता गंधार खरपुडीकर याने दिवाळीच्या दिवशी हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे.नुकतंच गंधारने पुण्यात हे हक्काचं घर खरेदी केलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गंधारने नवीन घरात गृहप्रवेश करत या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता गंधार खरपुडीकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन घरातील पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. स्वप्नपूर्ती... असं कॅप्शन देत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.#NewHome,#BappaBlessings तसंच #Punecity असे हॅशटॅगही त्याने या पोस्टला दिल्याचे पाहायला मिळतायत. तसेच या फोटोंद्वारे त्याने या भव्य घराची झलक दाखवली आहे. अभिनेत्याचं हे नवं घर फारच छान आहे. सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, गंधार खरपुडीकरच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याने गेली अनेक वर्षे तो चित्रपट, मालिका क्षेत्रात सक्रिय आहे. 'समांतर', 'बावरा दिल', 'लग्नाची बेडी' अशा कलाकृतीतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.