लग्नाच्या २ वर्षानंतर लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा; व्हिडीओ शेअर करत सांगितली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:09 IST2025-01-27T11:04:25+5:302025-01-27T11:09:26+5:30

लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, शेअर केली गुडन्यूज.

marathi television actor abhijeet shwetchandra and his wife announced about pregnancy share good news with fans shared video | लग्नाच्या २ वर्षानंतर लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा; व्हिडीओ शेअर करत सांगितली गुडन्यूज

लग्नाच्या २ वर्षानंतर लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा; व्हिडीओ शेअर करत सांगितली गुडन्यूज

Abhijeet Shwetchandra: 'नवे लक्ष्य', 'शुभविवाह' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) घराघरात पोहोचला आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांना आपलंसं केलं आहे. सध्या अभिजीत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच अभिनेता बाबा होणार आहे. याबद्दल इन्स्टाग्रामवर अनोख्या पद्धतीने त्याने गुडन्यूज शेअर केल्याची पाहायला मिळते.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिजीतने सुंदर असा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याची पत्नी सुद्धा दिसते आहे. दोघांनीही या व्हिडीओच्या माध्यमातून गुडन्यूज एक चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसतंय की अभिजीत-सेजल दोघे शेतामध्ये खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत बसल्याचे पाहायला मिळतायत. परंतु या वृत्तपत्रामध्ये छापलेली एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे. अभिजीत आणि सेजल वाचत असलेल्या या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 'द प्रेग्नन्सी पोस्ट' असं  ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं शीर्षक दिसतंय. त्याच्याखाली 'बेबी श्वेतचंद्र Coming Soon' असं लिहिलं गेलं आहे. अभिजीत-सेजलचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतो आहे.  शिवाय या दोघांनीही Twinning करत व्हिडीओ शूट केल्याचं पाहायला मिळतंय. 

अभिजीत श्वेतचंद्रने सोशल मीडियावर ही माहिती सांगताच मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता लवकरच अभिनेत्याच्या घरी पाळणा हळणार आहे. अभिजीत आणि सेजलने  २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता जवळपास २ वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याने वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर 'बापमाणूस', 'सुभेदार' या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. सध्या अभिजीत 'कलर्स मराठी' वरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत काम करताना दिसतो आहे. 

Web Title: marathi television actor abhijeet shwetchandra and his wife announced about pregnancy share good news with fans shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.