"तू सोडून गेल्यावर खूप रडलो", अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत, म्हणाला- आधी वाटलं स्वत:ला मारून टाकावं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:29 IST2024-01-12T15:29:16+5:302024-01-12T15:29:40+5:30

"माझी आठवण येते का...", अवधूत गुप्तेच्या पोस्टने वेधलं लक्ष

marathi singer avdhoot gupte new song album vishwamitra shared special post | "तू सोडून गेल्यावर खूप रडलो", अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत, म्हणाला- आधी वाटलं स्वत:ला मारून टाकावं, पण...

"तू सोडून गेल्यावर खूप रडलो", अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत, म्हणाला- आधी वाटलं स्वत:ला मारून टाकावं, पण...

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते त्याच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. अवधूत गुप्तेची अनेक गाणी सुपरहिटही झाली आहेत. सिनेमा आणि अल्बमसाठी गाणी लिहिण्याबरोबरच अवधूत गुप्तेने राजकीय पक्षांचे टायटल साँगही लिहिले आहेत. अवधूतच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. अवधूत सोशल मीडियावरुन नवीन गाण्यांच्या अपडेट्स पोस्टद्वारे चाहत्यांना देत असतो. सध्या अवधूतच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. 

अवधूत गुप्तेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "प्रीय जान...जानू ...जानेश्वरी...तू सोडून गेल्यावर खूप रडलो...पडलो ...धडपडलो...आधी वाटलं स्वतःला मारून टाकावं ...पण नंतर वाटलं की तू जशी 'मारून' गेलीस...त्यानंतर स्वतः च स्वतःला काय मारायचं?", असं अवधूतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे तो म्हणतो, "ही बघ माझी गाणी...एक अल्बम , चारगाणी...प्रत्येक गाणं...एका तुटलेल्या हार्टची कहाणी! इशय हार्ड हाय...कारण इशय 'हार्ट' हाय! बघ...माझी आठवण येते का..." 

नव्या गाण्याच्या अल्बमसाठी अवधूतने ही पोस्ट केली आहे. 'विश्वमित्र' असं त्याच्या गाण्याच्या अल्बमचं नाव असणार आहे. अवधूतने या अल्बमचा एक प्रोमो व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या नव्या अल्बमसाठी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: marathi singer avdhoot gupte new song album vishwamitra shared special post