Marathi Serials TRP Rating:   पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो टीआरपी रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:15 PM2022-06-16T18:15:52+5:302022-06-16T18:18:53+5:30

Marathi Serials TRP Rating: कोणती मालिका टीआरपी चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारे अनेक चाहते आहेत. तुम्हीही यापैकीच एक असाल तर या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट आला आहे.

Marathi Serials TRP Rating aai kuthe kay karte on no 2 rang maza vegla on no 1 | Marathi Serials TRP Rating:   पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो टीआरपी रिपोर्ट

Marathi Serials TRP Rating:   पुन्हा एकदा ‘ही’ मालिका ठरली नंबर 1; पाहा, काय म्हणतो टीआरपी रिपोर्ट

googlenewsNext

Marathi Serials TRP Rating:  मराठी मालिकांसोबत या मालिकांच्या टीआरपीकडेही प्रेक्षकांचं बरोबर लक्ष असतं. आठवड्यात कोणती मालिका टीआरपी  चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारेही अनेक चाहते आहेत. तुम्हीही यापैकीच एक असाल तर  या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट आला आहे. तेव्हा जाणून घेऊ या टीआरपी चार्टवरच्या टॉप 10 मालिकांबद्दल.  

10- सुरुवात करूया टीआरपी चार्टवरच्या 10 व्या क्रमांकाच्या मालिकेपासून. तर या आठवड्यात ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला मागे टाकत ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका  टॉप 10 मध्ये पोहोचली आहे. 
  
 9- ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका या आठवड्यात टीआरपी चार्टवर नवव्या क्रमांकावर आहे.  या मालिकेच्या जेजुरी महाएपिसोडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

 8-  या आठवड्याच्या टीआरपी रेसमध्ये आठव्या स्थानावर आहे स्टार प्रवाहवरील मालिका ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’. 
 
7- यश आणि नेहाच्या लग्नाच्या ट्विस्टमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीत सातवा क्रमांक पटकावला आहे.

 6- अप्पू आणि शशांकची केमिस्ट्री दाखवणारी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका या आठवड्यात टीआरपी शर्यतीत सहाव्या क्रमांकावर आहे.

5- नव्याने सुरु झालेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका सध्या पाचव्या स्थानावर आहे. 
 
4- चार क्रमांकावर कोणती मालिका आहे तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’.

3- ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका या आठवड्यात टीआरपी चार्टवर तिस-या स्थानावर आहे.
 
2- नेहमीच टीआरपी रेटींगमध्ये अव्वल असणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका या आठवड्यात दुस-या क्रमांकावर आहे.

1- टीआरपी चार्टवर पहिला क्रमांक पटकावला आहे तो ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनं. सध्या ही मालिका चांगलीच गाजतेय.

Web Title: Marathi Serials TRP Rating aai kuthe kay karte on no 2 rang maza vegla on no 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.