Marathi Serials : या आठवड्यात कोणत्या मालिकेनं मारली बाजी? काय म्हणतो TRP रिपोर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:29 PM2022-05-06T17:29:57+5:302022-05-06T17:58:45+5:30

Marathi Serials TRP Rating: मालिकांच्या टीआरपीकडेही प्रेक्षकांचं बरोबर लक्ष असतं. आठवड्यात कोणती मालिका टीआरपी चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारेही अनेक चाहते आहेत.

Marathi Serials TRP Rating aai kuthe kay karate to rang majha vegla | Marathi Serials : या आठवड्यात कोणत्या मालिकेनं मारली बाजी? काय म्हणतो TRP रिपोर्ट?

Marathi Serials : या आठवड्यात कोणत्या मालिकेनं मारली बाजी? काय म्हणतो TRP रिपोर्ट?

googlenewsNext

Marathi Serials TRP Rating:   प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि टीआरपी रेसमध्ये पहिला क्रमांक गाठण्यासाठी मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत असतात. काही वेळा ते यामध्ये यशस्वी होतात तर काही वेळा हा डाव फसतो आणि मालिकेचा टीआरपी खाली घसरतो. मराठी मालिकांसोबतचं या मालिकांच्या टीआरपीकडेही प्रेक्षकांचं बरोबर लक्ष असतं. आठवड्यात कोणती मालिका टीआरपी  चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारेही अनेक चाहते आहेत. तर या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट आला आहे. तेव्हा जाणून घेऊ या टीआरपी चार्टवरच्या टॉप 10 मालिकांबद्दल.  
 
10- सुरूवात करून या 10 स्थानावर असलेल्या मालिकेपासून. तर या आठवड्यात ‘अबोली’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत 10 व्या क्रमांकावर आहे.

9- टीआरपी चार्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहवरची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका.

 8- स्टार प्रवाह वरचीच ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ ही मालिका सध्या नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आली आहे. 

7- झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत सातवा क्रमांक पटकावला आहे.
 
6-  स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ ही लोकप्रिय मालिका टीआरपी रेटींगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

5-  स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका पाचव्या स्थानावर आहे.
 
4- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने टीआरपी लिस्टमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे.

 3- ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही किर्तीच्या अतुलनीय प्रवासाची गाथा सांगणारी मालिका टीआरपी चार्टवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 2 - नेहमीच टीआरपी चार्टवर अव्वल असणारी  ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका दुसऱ्या स्थानावर  आहे.
 
1- टीआरपी चार्टवर पहिला क्रमांक पटकावला आहे तो ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनं. सध्या ही मालिका चांगलीच गाजतेय.

Web Title: Marathi Serials TRP Rating aai kuthe kay karate to rang majha vegla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.