'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा चढला पारा, लगावली शालिनीच्या कानशीलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:48 IST2022-04-04T18:32:44+5:302022-04-04T18:48:07+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Marathi serial Sukh Mhanje Nakki Kay Asta gauri slaps to shalini | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा चढला पारा, लगावली शालिनीच्या कानशीलात

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा चढला पारा, लगावली शालिनीच्या कानशीलात

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलले होते. त्यानंतर माईंच्या साथीने गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात आली आहे. आता ती शालिनी आणि देवकी चांगलंच वठणीवर आणणार आहे. 

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोत गौरी शालिनीवर हात उचलताना दिसतेय. हे बघून देवकी घाबरून जाते. शालिनी आणि देवकी गौरीला घराबाहेर काढायला निघतात. गौरी शालिनीला म्हणते मला हात नाही लावयाचा शालिनी विचारते काय करशील गं, यावर गौरी म्हणते मी सांगणार नाही करुन दाखवणार. शालिनी गौरीला हात लावते आणि गौरी तिच्या कानाखाली मारते. हे सार पाहून माईंना हसू येते. 

शालिनी गौरीला म्हणते, हे लई महागात पडणार आहे तुला, गौरी म्हणते महागातल्या गोष्टी लई आवडतात मला. माई शालिनी आणि देवकीला जाब विचारतात. काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची, काही तरी उचापत्या करायलाच पाहिजे का. गौरी म्हणते यांनी माझ्यावर अन्याय केलाय मीच ठरवणार यांना काय शिक्षा द्यायची आहे ती. आता गौरी शालिनी आणि देवकीला का शिक्षा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 

Web Title: Marathi serial Sukh Mhanje Nakki Kay Asta gauri slaps to shalini