'नुसता शो ऑफ करते'; नवीन गाडी घेतल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल; उत्तर देत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:14 IST2023-06-13T19:14:17+5:302023-06-13T19:14:58+5:30
Megha ghadge: ट्रोल करणाऱ्या युजरला मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

'नुसता शो ऑफ करते'; नवीन गाडी घेतल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल; उत्तर देत म्हणाली...
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. उत्तम अभिनयासह मेघा तिच्या ठसकेबाज लावणीमुळेही कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असते. अलिकडेच मेघाच्या घरात एका नवीन सदस्याचं आगमन झालं. मेघाने नवी कोरी कार खरेदी केली. त्यामुळे अनेक जण तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मात्र, यामध्येच एका युजरने खोचक कमेंट करत मेघाला ट्रोल केलं आहे. परंतु, या ट्रोलरला मेघाने भन्नाट उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं आहे.
मराठी धमाल या इन्स्टाग्रामवर पेजवर मेघाने नवीन कार खरेदी केल्याची माहिती दिली. 'अभिनेत्री मेघा घाडगेने स्वबळावर घेतली नवीन कार', असं कॅप्शनही त्यांनी दिलं होतं. यावर, कमेंट करत,ही पहिली नाही 5 वी आहे ..आणि सगळ्या स्वबळावर घेतल्या. car lover आहे मी , असं उत्तर मेघाने दिलं. मेघाचं हे उत्तर वाचल्यावर एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं. मात्र, या ट्रोलरला मेघाने भन्नाट उत्तर दिलं.
काय म्हणाली मेघा?
'घेतली तर आम्हाला थोडी त्यात बसवणार आहे... उगीचच show off kryach', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. त्यावर मेघाने 'जळकुंडे' अशी कमेंट करत प्रत्युत्तर दिलं. सोबतच हसणारे इमोजीही टाकल्या.
दरम्यान, मेघाच्या या उत्तराची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे. मेघा मराठी कलाविश्वातील होतकरु आणि गुणी अभिनेत्री आहे. अलिकडेच ती बिग बॉस मराठीमध्येही झळकली होती. मेघा तिच्या लावणीमुळेही कायम चर्चेत येत असते.