फुलपाखरू या मालिकेच्या विशेष भागात हजेरी लावणार हे सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:07 IST2019-03-18T16:02:57+5:302019-03-18T16:07:41+5:30

प्रत्येक तरुणाने स्वतःच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीला कसे प्राधान्य दिले पाहिजे यावर मानस आणि वैदेही आता फुलपाखरूची गोष्ट पुढे नेतील. या गोष्टीचा एक भाग म्हणजेच मानसच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कलाकारांच्या मांदियाळीत दणक्यात साजरा झाला असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Marathi celebrity in zee yuva phulpakharu special episode | फुलपाखरू या मालिकेच्या विशेष भागात हजेरी लावणार हे सेलिब्रेटी

फुलपाखरू या मालिकेच्या विशेष भागात हजेरी लावणार हे सेलिब्रेटी

ठळक मुद्देमराठी टीव्ही आणि चित्रपटमधील आघाडीच्या कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींनी या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मानसला सपोर्ट करण्यासाठी वैदेहीच्या आग्रहाखातर उपस्थिती दर्शवली आणि मानसला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. या मालिकेच्या कथेने आजवर अनेक वळणं घेतली. मानस आणि वैदेहीच्या महाविद्यालयीन प्रेमकथेने सुरू झालेली फुलपाखरू या मालिकेची कथा, असंख्य तरुण तरुणींच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब ठरली. मानसमध्ये मुलींना त्यांच्या मनातील प्रियकर तर वैदेही मध्ये मुलांना त्यांची ड्रिमगर्ल दिसली. त्यांनतर या मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न हे प्रेक्षकांना या मालिकेशी घट्ट जोडण्यात यशस्वी ठरले. 

प्रेम, ईर्षा, दोस्ती, शत्रूत्व, किशोरवयीन गर्भधारणा, त्यांनतरची मानसिकता, लग्न, बाळंतपण अशा अनेक विषयांना हात घालत मानस आणि वैदेहीची जोडी त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक तरुणाने स्वतःच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीला कसे प्राधान्य दिले पाहिजे यावर मानस आणि वैदेही आता फुलपाखरूची गोष्ट पुढे नेतील. या गोष्टीचा एक भाग म्हणजेच मानसच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कलाकारांच्या मांदियाळीत दणक्यात साजरा झाला असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मंगळवार दिनांक १९ मार्चला रात्री ८:३० वाजता फुलपाखरू मालिकेचा हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी प्रेक्षकांसाठी हा अशा आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले. त्यांच्याबरोबर आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम केलेली ही कलाकार मंडळी मंदार देवस्थळीच्या प्रेमापोटी एकही पैसा न घेता विशेष भागात सहभागी झाली. 

मराठी टीव्ही आणि चित्रपटमधील आघाडीच्या कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींनी या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मानसला सपोर्ट करण्यासाठी वैदेहीच्या आग्रहाखातर उपस्थिती दर्शवली आणि मानसला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. या विशेष भागात प्रेक्षकांना अनेक नामवंत चेहेरे पाहायला मिळणार आहेत. रोहिणी हट्टंगडी, उमेश कामत, वैभव मांगले, संजय जाधव, अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे, सुचिता थत्ते, लीना भागवत, मुग्धा गोडबोले आणि त्याचबरोबर सूर राहू दे मालिकेतील संग्राम साळवी, नक्षत्रा मेढेकर, प्रिया मराठे, उदय सबनीस हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. श्रेयश तळपदेने व्हिडिओद्वारे मानसला शुभेच्छा दिल्या. "ओढ तुझी 'असे या कविता संग्रहाचे नाव ठेवले असून याचे प्रकाशन या सर्व नामवंत लोकांच्या हस्ते मालिकेमधील या विशेष भागामध्ये होणार आहे.

Web Title: Marathi celebrity in zee yuva phulpakharu special episode