मराठी बिग बॉस २ : माझी तर वाटच लागली, असे का म्हणताहेत बिग बॉसच्या घरात सुरेखा पुणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 11:39 IST2019-06-01T11:39:15+5:302019-06-01T11:39:44+5:30
'बिग बॉस मराठी'मधील टास्क अगदी जोमात आहेत. असे वाटते की, स्पर्धकांनी गटबाजी करण्यास सुरूवात केली आहे.

मराठी बिग बॉस २ : माझी तर वाटच लागली, असे का म्हणताहेत बिग बॉसच्या घरात सुरेखा पुणेकर
'बिग बॉस मराठी'मधील टास्क अगदी जोमात आहेत. असे वाटते की, स्पर्धकांनी गटबाजी करण्यास सुरूवात केली आहे. या सीजनच्या पहिल्या टास्कसाठी घरातील सदस्यांना दोन टीम्समध्ये विभागण्यात आले. एका टीमचे नेतृत्व अभिजीत बिचुकले आणि दुसऱ्या टीमचे नेतृत्व वैशाली माडेकडे सोपवण्यात आले. आम्ही वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या माध्यमातून तुमच्यासाठी चटकदार किस्से सादर केले जात आहेत.
पराग कान्हेरे व माधव देवचके हे किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्या क्रॉस-ड्रेसिंग टास्कबाबत चर्चा करताना दिसले. शेफ परागला मुद्दाम सुरेखाला असुविधाजनक कपडे घालायला सांगितलेल्या त्याच्या टीममधील सदस्यांचा खूप राग आला. माधव सुरेखाची बाजू घेतो. तसेच असे करण्याची कोणाची योजना होती हे देखील जाणण्यासाठी उत्सुक असतो. पराग त्याची बाजू मांडत म्हणतो, ''मला यांच्या इज्जतीची काळजी आहे. ही लोकं कलावंत आहेत!'' सुरेखा मान्य करत प्रतिसाद देते आणि म्हणते, ''माझी तर वाटच लागली सगळी.''
यादरम्यान पराग पुढे येत म्हणला, ''माझे काही प्रिन्सिपल्स आहेत आयुष्यामध्ये, ती प्रिन्सिपल्स मी जपली.'' तर बिचुकले या सर्व मतांना मान हलवत होकार दर्शवतो.
यामुळे प्रभावित झालेला माधव परागच्या मताची प्रशंसा करतो. ते दोघेही इतर स्पर्धकांना (मुलींना) प्रश्न विचारायला जातात. पराग म्हणतो, ''त्या २२-२३ वर्षांच्या मुली आहेत, त्यांना काय कळणार'' कारण त्या सुरेखाची अस्वस्थता जाण्यामध्ये असमर्थ ठरतात.