तुषार आणि मल्लिका शेरावतसोबत 'ही' मराठी अभिनेत्री दिसणार वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 11:41 IST2019-02-28T11:30:57+5:302019-02-28T11:41:33+5:30

'बू... सबकी फटेगी' या पहिल्या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमधून अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तुषार कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत.

'This Marathi' actress will be seen in WebSeries with tushar and Mallika Sherawat | तुषार आणि मल्लिका शेरावतसोबत 'ही' मराठी अभिनेत्री दिसणार वेबसीरिजमध्ये

तुषार आणि मल्लिका शेरावतसोबत 'ही' मराठी अभिनेत्री दिसणार वेबसीरिजमध्ये

ठळक मुद्देया सीरिजमध्ये मल्लिका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे

ऑल्टबालाजीवरील 'बू... सबकी फटेगी' या पहिल्या हॉरर कॉमेडी वेब सीरिजमधून अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तुषार कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत. या वेबसीरिजमध्ये अश्विनी काळसेकर आणि मुकेश तिवारी या प्रतिभावान कलाकारांचाही समावेश झाला आहे.या वेबसीरिजची कथा काही मित्रांभोवती आधारीत असून ते एका रिकाम्या रिसॉर्टमध्ये जातात. तिथे अशा काही घटना घडतात. ज्यामुळे त्यांचा थरकाप उडतो. या सीरिजमध्ये मल्लिका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला या अंदाजात पाहणे कमालीचे ठरणार आहे. गोलमाल सीरिजमध्ये प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन केलेली ही जोडी आता ऑल्टबालाजीच्या नव्या सीरिजमध्ये भूत बनून नव्याने धमाल करण्यास सज्ज आहेत. यात त्यांच्या जोडीला असतील किकू शारदा, संजय मिश्रा, शेफाली जरीवाला आणि कृष्णा अभिषेक. फरहाद सामजी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

अश्विनी म्हणाली, ''ऑल्टबालाजीच्या वेबसीरिजमधून पदार्पण करताना मला आनंद होत आहे.एकता कपूर आणि मी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळेच, ऑल्टबालाजीसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. मला निवडल्याबद्दल फरहाद सरांची मी आभारी आहे.

 मला तुषार कपूर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली.  त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे धमाल असते. शिवाय, तिथे मी बरंच शिकलेय. इतकंच नाही, मल्लिका शेरावतसोबत पहिल्यांदा काम करणं हासुद्धा छान अनुभव होता. असे प्रतिभावान कलाकार आणि उत्तम पटकथा यामुळे हा शो प्रेक्षकांना नक्की आवडेल.''
 

Web Title: 'This Marathi' actress will be seen in WebSeries with tushar and Mallika Sherawat