"अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा..."; विशाखा सुभेदार यांचा विलक्षण अनुभव जरुर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 20:08 IST2024-02-29T20:07:44+5:302024-02-29T20:08:49+5:30

विशाखा सुभेदार यांचं घर सांभाळणाऱ्या महिलेची थक्क करणारी कहाणी वाचा

marathi actress Vishakha Subhedar's house keeping woman experience post viral | "अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा..."; विशाखा सुभेदार यांचा विलक्षण अनुभव जरुर वाचा

"अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा..."; विशाखा सुभेदार यांचा विलक्षण अनुभव जरुर वाचा

विशखा सुभेदार या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. विशाखा यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. यामुळे त्यांंचं घर सांभाळणाऱ्या बाईंचं आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विशाखाताईंचं कौतुक होतंय. विशाखा सुभेदार यांनी बाईंचा फोटो शेअर करुन खास पोस्ट लिहीली आहे. 

विशाखाताई लिहीतात, "आज सकाळी माझ्या अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा "शोभा "तिचा फोन आला..
ताई good news आहे,
(मला वाटलं पोराचा लग्नाची तारीख काढली असावी..!)
मी म्हटलं "काय गं??"
तर म्हणली ताई... घर book केल 2 bhk.. खुप आनंद, उत्साहात सांगत होती..
मलाही खुप आनंद झाला.. अंबरनाथ west ला थोडं स्लम एरिया मध्ये रहाणारी,चौदा वर्षपूर्वी शोभा माझयाकडे जवळ जवळ रोज 40 मिनिट चालत कामाला यायची, तिची धावपळ आणि पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घरा जवळ मी भाडयाने घर घेऊन दिल, तर वाचलेल्या वेळेत तीने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली, शिक्षण झाली..."

विशाखाताई पुढे लिहीतात, "एकदा फ्रीज घायचा म्हणाली पगारातून एक हजार कापा, तुम्ही घेऊन दया फ्रिज.. आणी तीने फेडले पैसे.. धाडसी बाई..! तिच्या मुलांनी सुद्धा खुप कष्ट केले...10/12 वी नंतर कुठे कुठे छोटयामोठ्या नोकऱ्या केल्या, घराला हातभार लावला, मग मोठा मुलगा उत्तम पगाराने कामाला लागला.. पुन्हा शोभा चा फोन.. ताई शुभम ला इतक्याइतक्या पगाराची नोकरीं लागली...! पुन्हा फोन ताई लग्न ठरलं...! पुन्हा फोन..धाकटी पोर पास झाली..!
तिची तिची अनेक शिखर तीने ओलांडली.. आज तिचा प्रवास पहिला कीं मलाच खुप समाधान मिळत .! तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे..! माझ्या कडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली कीं कोण कौतुक वाटत मला...!
मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर..!"

विशाखाताई शेवटी लिहीतात, "माझ्याकडे स्पॉटबॉय म्हणून आलेला" शिवा" त्याला मी क्लासला लावले, ड्रायविंग शिकवलं आणि त्याचा ड्राइव्हर झाल्यावर,त्याला उत्तम पगाराची नोकरीं सुद्धा लागली.. अर्थात त्याचे कष्ट आहेतच, पण मी फक्त एक मार्ग झाले ह्याचा मला आंनद होतों कायमच..!
परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार.. माझ्या शोभाचे खुप कौतुक."

Web Title: marathi actress Vishakha Subhedar's house keeping woman experience post viral

टॅग्स :marathiमराठी