'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:41 PM2024-06-25T15:41:44+5:302024-06-25T15:42:24+5:30

फोटोत दिसणाऱ्या या दोन अभिनेत्रींना ओळखलंत का?

marathi actress Vidisha Mhaskar and Nishhani Borule are rommates in real life | 'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो

'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो

अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात. इथेच भाड्याने घर घेऊन राहतात आणि संघर्ष करतात. बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री येथील प्रत्येक कलाकार कधी ना कधी भाड्याच्या घरात राहिला आहे. शाहरुख खान ते कार्तिक आर्यनसारख्या अभिनेत्यांनी मुंबईत राहण्यासाठी संघर्ष केला आहे. दरम्यान मराठी मालिकांमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या एकमेकींसोबत राहतात. या  दोन अभिनेत्रींनी नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतरची पोस्ट शेअर केली आहे.

फोटोत दिसणाऱ्या या दोन अभिनेत्रींना ओळखलंत का? स्टार प्रवाहवरील सध्या गाजत असलेल्या मुरांबा मालिकेतली रेवा म्हणजेच अभिनेत्री निशानी बोरुले (Nishhani Borule) तर 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदिशा म्हसकर (Vidisha Mhaskar). या दोघी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात रुममेट्स आहेत. नुकतंच त्या नवीन घरात शिफ्ट झाल्या आहेत. नव्या घरात हातात चहाचा कप घेऊन खिडकीपाशी बसून त्यांनी छान फोटो शेअर केला आहे. विदिशाने पोस्ट शेअर करत लिहले, "जिथे मुलींना आपल्या पार्टनरसोबत राहायचं असतं अशा जगात आम्ही दोघींनी एकमेकींसोबत राहत आहोत. नवीन घर, नवी सुरुवात, सगळंच नवं. नवीन घराची पार्टी मात्र नाहीए हा."

इंडस्ट्रीतील मित्रपरिवाराने दोघींना शुभेच्छा दिल्या आहेत. निशानीची 'मुरांबा'ही पहिलीच मालिका आहे ज्यामुळे तिला घरोघरी ओळख मिळाली. तर विदिशाने याआधी 'भाग्य दिले तू मला','मन बावरे','चांदणे शिंपीत जाशी' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या दोघींशिवाय अभिनेत्री आरती मोरे आणि प्रियदर्शनी इंदलकर या दोघीही रुममेट आहेत. आरती मोरे नुकतीच 'पिंकीचा विजय असो' मालिकेत दिसली तर प्रियदर्शिनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धीझोतात आली. 

Web Title: marathi actress Vidisha Mhaskar and Nishhani Borule are rommates in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.