आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे...; अपघातानंतर ‘वच्छी’ आत्याची भावनिक पोस्ट, वाचून व्हाल भावुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 11:54 AM2021-12-17T11:54:28+5:302021-12-17T11:56:38+5:30

होय, आम्ही बोलतोय ते वच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale)  यांच्याबद्दल. काही महिन्यांपूर्वी  एका पुरस्कार सोहळ्यावरून मुंबईत परतत असताना वर्षा यांच्या कारला अपघात झाला होता.

marathi actress varsha dandale instagram post viral after the accident | आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे...; अपघातानंतर ‘वच्छी’ आत्याची भावनिक पोस्ट, वाचून व्हाल भावुक

आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे...; अपघातानंतर ‘वच्छी’ आत्याची भावनिक पोस्ट, वाचून व्हाल भावुक

googlenewsNext

‘नांदा सौख्य भरे’मधील वच्छी आत्याला तुम्ही इतक्यात विसरला नसालंच...होय, आम्ही बोलतोय ते वच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale)  यांच्याबद्दल. काही महिन्यांपूर्वी  एका पुरस्कार सोहळ्यावरून मुंबईत परतत असताना वर्षा यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. अंथरूणाला खिळल्या होत्या. पण आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.
तूर्तास वर्षा यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. शिवाय स्वत:चे काही वेगवेगळ्या मूडमधील फोटोही शेअर केले आहेत.

‘आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे 😂😂
Just kidding 😂.. दिन अच्छे ही है.. आरामके.. सुकून के.. अपनो के साथ.. सपनो की बात.. चलना ही जिंदगी है.. रुकना है मौत 'तेरी.... 😊’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
अन्य एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रियजनांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. वेळ मौल्यवान आहे आणि माझे प्रियजन मला हेच अनमोल क्षण मला देतात, अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.

संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना वर्षा यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. आत्ताही त्या याच नावाने ओळखल्या जातात.

‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेत त्यांनी साकारलेली लता काकूची भूमिकाही अशीच गाजली होती. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेत लता काकूंची भूमिका केली. या मालिकेनंतर ‘ घाडगे अँड सून’ मालिकेत सुकन्या कुलकर्णीच्या थोरल्या जाऊची भूमिका साकारली.  पाहिले न मी तुला, एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केलं आहे.

Web Title: marathi actress varsha dandale instagram post viral after the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.