'त्यांनी अथांगचे जोरात गाल ओढले अन्..'; उर्मिला निंबाळकरला आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:40 PM2023-11-06T16:40:42+5:302023-11-06T16:41:03+5:30

Urmila nimbalkar: अलिकडेच उर्मिला अथांगला घेऊन दिवाळीच्या खरेदीसाठी गेली होती. मात्र, एका महिलेमुळे तिला भयानक अनुभव आला.

marathi-actress-urmila-nimbalkar-told-about-the-incident-with-her-boy | 'त्यांनी अथांगचे जोरात गाल ओढले अन्..'; उर्मिला निंबाळकरला आला वाईट अनुभव

'त्यांनी अथांगचे जोरात गाल ओढले अन्..'; उर्मिला निंबाळकरला आला वाईट अनुभव

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar). आज उर्मिला मराठी सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. उर्मिला निंबाळकर या युट्यूब चॅनेलवर ती लाइफस्टाइल, ट्रॅव्हल, मेकअप आणि डीआयवाय यांसारखे असंख्य व्हिडीओ शेअर करत असते. विशेष म्हणजे या चॅनेलवरुन तिने बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यातील काही घटना, किस्सेही शेअर केले आहेत. परंतु, यावेळी तिने अथांगला आलेला अनुभव शेअर केला आहे. तसंच लहान मुलांसोबत असं वागू नका, अशी विनंतीही चाहत्यांना केली आहे.

अलिकडेच उर्मिला अथांगला घेऊन दिवाळीच्या खरेदीसाठी गेली होती. मात्र, एका महिलेमुळे तिला भयानक अनुभव आला. ज्यामुळे तिने पुन्हा मुलांसोबत असं करु नका कळकळीने सांगितलं. उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

 “एक कळकळीची विनंती… आज (काल) संध्याकाळी मी, सुकीर्त आणि अथांग रस्त्यावर आकाशकंदील खरेदी करताना, मागून अचानक एक बाई आल्या. त्यांनी अथांगला अचानक मागून पकडले आणि जोरात त्याचे गाल ओढले. त्याने तो खूपच घाबरला आणि रडायला लागला. ही बाळांमधील या वयातील अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. त्याला ‘Stranger Danger’ असे वैज्ञानिक नावही आहे.”

“अथांगला व्हिडीओमध्ये पाहून त्याच्याविषयी प्रेमाची भावना असणे हे अगदी बरोबर आहे. पण २५ महिन्याच्या बाळाला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून त्याचे फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून स्वतःच्या जवळ खेचणे, बाहेरील अस्वच्छ हाताने बाळाला पकडणे, तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवत जाणे हे अयोग्य आहे आणि अथांगसाठी असुरक्षितही. विचारल्यानंतर फोटोच काय तर घरी जेवायला सुद्धा येऊ आम्ही, परंतु आपल्या अट्टाहासात बाळाचे हाल करणे मला पटत नाही,” असं उर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: marathi-actress-urmila-nimbalkar-told-about-the-incident-with-her-boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.