‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत प्रिया मराठेच्या जागी तेजस्विनी लोणारीची एंट्री, अभिजीत खांडकेकर म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:56 IST2023-07-04T11:50:19+5:302023-07-04T11:56:00+5:30

प्रियाच्या जागी यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मोनिकाची भूमिका साकारणार आहे.

Marathi actress Tejaswini lonari to replace priya marathe in tuzech mi geet gaat aahe serial abhijeet khandkekar said | ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत प्रिया मराठेच्या जागी तेजस्विनी लोणारीची एंट्री, अभिजीत खांडकेकर म्हणाला....

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत प्रिया मराठेच्या जागी तेजस्विनी लोणारीची एंट्री, अभिजीत खांडकेकर म्हणाला....

सध्या छोट्या पडद्यावर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे आणि अन्य कलाकार यांनी उत्तमरित्या त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, या मालिकेतून अभिनेत्री प्रिया मराठेने  एक्झिट घेतली. 

स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर प्रियाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तिने ही मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं.

काय म्हणाली प्रिया?
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मी मोनिका कामत हे पात्र साकारत होते.  या पुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये. अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागल आहे.  मोनिका कामत ही भूमिका करताना मला खूप मज्जा येत होती.  तुम्हालाही ही भूमिका खूप आवडत होती. तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना वेळ देऊ शकत होते, तो वेळ कुठेतरी कमी पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट, प्रोडक्शन टीम, तसंच तो रोलही फार डिमांडिग होता. या सगळ्याला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी मालिकेतून निरोप घेतेय", असं प्रिया म्हणाली.

प्रियाच्या जागी यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मोनिकाची भूमिका साकारणार आहे. तिने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

''खूप आनंद होतोय सांगताना की मी स्टार प्रवाह परिवारची सदस्य झाले आहे. तर पाहायला विसरू नका “तुझेच मी गीत गात आहे”. फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री ९ वाजता.ह्या छोट्या चिमुकली सोबतचा हा गमतीदार वीडियो. धन्यवाद स्टार प्रवाह.''  असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर अभिनेता अभिजीत खांडकेकरने कमेंट केली आहे. “तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे”, असे त्याने म्हटले आहे. त्यावर तेजस्विनीने “धन्यवाद” असे म्हटलं आहे.

Web Title: Marathi actress Tejaswini lonari to replace priya marathe in tuzech mi geet gaat aahe serial abhijeet khandkekar said