"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:55 PM2023-10-06T12:55:01+5:302023-10-06T12:57:07+5:30

प्रसिद्ध अभिनेत्रीने छेड काढणाऱ्या मुलांना दिलेला चोप, स्वत:च केलेला खुलासा म्हणाली...

marathi actress surabhi bhave talk about her school days said i fight with 4 boys who teased me | "छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..."

"छेड काढणाऱ्या ४ मुलांना मी धुतलंय", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मी सैनिकी शिक्षण..."

googlenewsNext

'स्वामिनी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुरभीचा चाहता वर्गही मोठा आहे. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करुन ती चाहत्यांना माहिती देत असते. नुकतंच सुरभीने तिचं युट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. 

या चॅनेलवरुन ती वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना माहिती देत असते. सुरभीने नुकतंच तिच्या युट्यूब चॅनेलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या शालेय जीवनाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडिओत सुरभीने चार मुलांना चोप दिल्याचा खुलासा केला आहे.  सुरभी म्हणाली, "मी मुळची कोकणातील गुहागरची. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्ये झालं. पण, माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमुळे. ही आशिया खंडातील पहिली मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा आहे. या शाळेच्या पहिल्या बॅचची मी पास आऊट आहे." 

"त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. अभ्यासाबरोबरच इथे स्विमिंग, रायफल शूटिंग, योगा, कराटे अशा गोष्टींचंही प्रशिक्षण मिळतं. त्याबरोबरच इथे सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळेच आजपर्यंत माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला दिलं जातं," असा खुलासा सुरभीने या व्हिडिओत केला आहे. सुरभी सध्या 'राणी मी होणार' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याबरोबरच सुरभी 'भाग्य दिले तू मला', '३६ गुणी जोडी' या मालिकेतही झळकली आहे. 

Web Title: marathi actress surabhi bhave talk about her school days said i fight with 4 boys who teased me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.