Video: श्रेया बुगडे बनली हॉटेलची मालकीण! मुंबईतल्या 'या' भागात सुरु केलं स्वत:चं रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:01 IST2024-01-26T16:00:13+5:302024-01-26T16:01:10+5:30

श्रेयाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मराठी कलाकार

marathi actress Shreya Bugde opens her new restaurant the big fish and co in dadar | Video: श्रेया बुगडे बनली हॉटेलची मालकीण! मुंबईतल्या 'या' भागात सुरु केलं स्वत:चं रेस्टॉरंट

Video: श्रेया बुगडे बनली हॉटेलची मालकीण! मुंबईतल्या 'या' भागात सुरु केलं स्वत:चं रेस्टॉरंट

मराठी इंडस्ट्रीतील अनेक मंडळी सध्या व्यवसायाच्या नवनव्या वाटा शोधत आहे. यामध्ये अनेकांनी स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी ठाण्यात 'महाराजा' हे हॉटेल सुरु केलं. तर भगरे गुरुजींची लेक अनघानेही पुण्यात 'वदनी कवळ घेता' रेस्टॉरंट सुरु केलं. आता 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेनेही (Shreya Bugde) चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. श्रेयाने दादरमध्ये स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.

श्रेया बुगडेच्या दादरमधील नव्या रेस्टॉरंटचा आजच शुभारंभ झाला. 'द बिग फिश अँड कंपनी' असं तिच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. सीफुड साठी स्पेशल असं हे हॉटेल आहे. त्यामुळे खवय्यांची नक्कीच चंगळ असणार आहे. आजच्या या खास दिवशी श्रेया आपला नवरा आणि सासू सासरे यांच्यासोबत दिसली. तिला शुभेच्छा देण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आवर्जुन आले. श्रेयाचं कौतुक करण्यासाठी संजय मोने, सुकन्या मोने, हर्षदा खानविलकर, संजय जाधव याांची झलक पाहायला मिळाली.

श्रेयाने कुटुंबासोबत मिळून केक कट केला. तिने खास ग्रे रंगाची साडी नेसली होती. विशेष म्हणजे या साडीवर माशाचं चित्र होतं. हॉटेलला साजेसा असा तिचा लूक होता. तसंच दादरसारख्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी तिने हे हॉटेल सुरु केलं आहे. कुटुंब आणि मित्रपरिवारासह तिने आज दिवस साजरा केला. चाहत्यांनीही तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: marathi actress Shreya Bugde opens her new restaurant the big fish and co in dadar