नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:42 IST2024-06-17T08:42:22+5:302024-06-17T08:42:57+5:30

अभिनेत्री शिवानी सुर्वेची नवीन मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं आजपासून स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. त्यानिमित्त शिवानीने तिच्या चाहत्यांना खास आवाहन केलंय (shivani surve)

marathi actress Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz star pravah | नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."

नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."

शिवानी सुर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शिवानीने आजवर विविध मालिका, सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडलीय. शिवानीच्या नवीन मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही शिवानीची नवी मालिका आजपासून स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. त्यानिमित्त शिवानी सुर्वेने खास पोस्ट लिहित चाहत्यांना अपील केलंय. काय म्हणाली शिवानी बघूया. 

शिवानी सुर्वेचं चाहत्यांना खास आवाहन

शिवानी सुर्वेने नव्या मालिकेचं पोस्टर शेअर केलंय. त्याखाली शिवानीने कॅप्शन लिहिलंय की, '१२ वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवारा सोबत एक प्रवास सुरु केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. “देवयानी” ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आज पर्यंत मनात ठेवलं. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करते आहे स्टार प्रवाह बरोबर, “थोड तुझं आणि थोड माझं” या मालिके मधून मी येणार आहे तुम्हाला भेटायला. या “मानसी” वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे कि “ मानसी” सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल.तुमच्या शुभेच्या शुभाशीर्वाद कायम राहुद्यात.'

शिवानीच्या नव्या मालिकेविषयी

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे.  याविषयी शिवानी सांगते की, "स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे." 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका आज म्हणजेच १७ जूनपासून सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहवर रात्री ९ वाजता बघायला मिळेल.

Web Title: marathi actress Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz star pravah