"डिप्रेशनमध्ये गेलेले, जीव द्यायचे विचार...", घटस्फोटावेळी शर्मिष्ठा राऊतची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:42 IST2025-12-26T15:38:19+5:302025-12-26T15:42:03+5:30
"दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होते, अन्...", घटस्फोटाबाबत शर्मिष्ठा राऊतचं भाष्य, अभिनेत्री म्हणाली...

"डिप्रेशनमध्ये गेलेले, जीव द्यायचे विचार...", घटस्फोटावेळी शर्मिष्ठा राऊतची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाली...
Sharmishta Raut: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. आजवर अभिनेत्रीने अनेक मालिका,चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयानंतर शर्मिष्ठा राऊतने निर्मिती क्षेत्रातही चांगलं काम करताना दिसते आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. शर्मिष्ठा राऊतचं पहिलं लग्न अमेय निपाणकरसोबत झालं होतं. पण, २०१८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिष्ठाने यावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच शर्मिष्ठा राऊतने 'मज्जा पिंक'च्या 'हीलिंग सर्कल विथ वनश्री' ला कार्यक्रमात हजेरी लावली. त्यादरम्यान, आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाविषयी सांगितलं. दरम्यान, ती म्हणाली,"बिग बॉस आधी माझी एक माझी एक मेजर जर्नी सुरु होती. यादरम्यान मी मेडिकेशनवर होते. मी दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होते. म्हणजे जीव देण्यासापासून सगळे विचार माझ्या डोक्यात येऊन गेले होते. प्रयत्न करू की नको करु. तेव्हा असाही डोक्यात विचार यायचा की हे जर आपण केलं तर जे काही अधुत्त्व आधीच आलं असेल तर ते असं शरीर घेऊन, असं मन घेऊन आई-वडिलांवर का अजून भार देऊन आपण जगायचं."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,"डिप्रेशन म्हटल्यावर वाटेल ते विचार आपल्या मनात येत असतात. याच्यातून काय मार्ग काढायचा हे मला नीट कळत नव्हतं. त्यावेळी
काउन्सिलिंग चालू होतं. कारण, घटस्फोटाची प्रोसेस त्यादरम्यान सुरू होती.तेव्हा मी माझ्या एक्स नवऱ्यावर १०० ताशेरे ओढले त्याने माझ्यावर ओढले. हे असं वातावरण असायचं. पण जसं जसं माझं काऊन्सलिंग होऊ लागलं तशी मी शांत होत गेले."
त्या माणसाचा दोष नाही किंवा माझाही दोष नाही...
"जेव्हा माझं काऊन्सलिंग सूरू झालं तेव्हा मला जाणवलं,त्या माणसाचा दोष नाही किंवा माझाही दोष नाही आहे. कायम दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही आहे. म्हणून तो माणूस चुकीचा आहे का तर नाही. त्याची जडण-घडण तशी झाली आहे."असं मत तिने या मुलाखतीत व्यक्त केलं.