so cute! सई लोकूरने वाढदिवशी पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:20 IST2024-09-05T13:19:30+5:302024-09-05T13:20:16+5:30

मराठी अभिनेत्री सई लोकूरने तिच्या वाढदिवशी पहिल्यांदाच तिच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर दाखवला आहे

marathi actress sai lokur first time show her daughter taashi face in social media | so cute! सई लोकूरने वाढदिवशी पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

so cute! सई लोकूरने वाढदिवशी पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई लोकूरला आपण अनेक मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्येही सहभागी झालेली. सईने काहीच महिन्यांपूर्वी तिच्या मुलीला जन्म दिला. सईने इतक्या दिवसात तिच्या मुलीची झलक दाखवली नव्हती. तिचा चेहरा लपवून ठेवला होता. पण आज स्वतःच्या वाढदिवशी सईने तिच्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. सईच्या मुलीला पाहताच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. 

सईची मुलगी दिसायला खूपच क्यूट

सईने मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सईची लेक दिसायला खूपच गोड आहे. सई हा फोटो शेअर करत म्हणाली, "आज माझ्या वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी, मी तुम्हाला देवाने मला दिलेल्या सर्वोत्तम भेटवस्तूची ओळख करून देऊ इच्छितो. माझी प्रिय मुलगी तशी. इथे ती आहे! मी तिला इन्स्टावर पहिल्यांदा समोर आणत आहे.ती माझ्यासाठी जग आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करते ते शब्दांत व्यक्त करता येत नाही."


सई पुढे लिहिते, "आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि मी आणखी काही मागू शकत नाही. ताशी हे माझे जीवन आहे आणि ती मला मिळालेली सर्वात चांगली भेट आहे. तुम्ही आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्यापैकी प्रत्येकाचे मनापासून आभार." अशी पोस्ट करुन सईने लेकीचं कौतुक केलंय. याशिवाय सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'सईची मुलगी दिसायला खूपच क्यूट', 'आई आणि बाबासारखीच लेकही दिसायला सुंदर', अशा कमेंट करुन सईची लेक ताशीचं सर्वांनी कौतुक केलंय. १७ डिसेंबर २०२३ ला सई आणि तीर्थदीप या नवरा-बायकोच्या आयुष्यात ताशी या चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.

 

Web Title: marathi actress sai lokur first time show her daughter taashi face in social media