'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:05 IST2025-06-19T12:04:26+5:302025-06-19T12:05:11+5:30
त्याचं क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम आहे आणि मला..., अनुष्काबद्दलही काय म्हणाली अभिनेत्री?

'ही' मराठी अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात; म्हणाली, "त्याचं नाव घेतलं की लाजते..."
क्रिकेटपटू विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव घेतलं की अनेक तरुणी भुवया उंचावतात. त्याचे लूक्स, खेळण्यातलं अग्रेशन सगळंच त्यांना प्रचंड आवडतं. विराटवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अनेक जणी आहेत. कित्येक बॉलिवूड कलाकारांनीही आवडता क्रिकेटपटू विचारलं की विराटचंच नाव घेतलं आहे. आता नुकतंच एका मराठी अभिनेत्रीनेही विराटवरचं तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याच्यातलं तिला काय आवडतं हेही तिने सांगितलं आहे.
ही मराठी अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस' फेम रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). आरसीबी जिंकल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर आनंद साजरा केला होता. नुकतंच सुमन मराठी म्युझिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रुचिराला विराटबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, "आजकाल मी त्याचं नाव घेतलं की लाजते. मला तो फार आवडतो. त्याचं मैदानावरचं अग्रेशन मला आवडलं. तेव्हापासून मी त्याची चाहती आहे. तो खूप अनफिल्टर्ड आहे. तो जसा आहे तसाच तो दाखवतो. जेव्हा टीमला गरज असते तेव्हा तो उभा असतो. तो खरंच खूप मस्त आहे."
ती पुढे म्हणाली, "त्याचा मला आवडणारा एक गुण म्हणजे तो खूप पॅशनेट आहे. त्याचं क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम आहे. तसंच तो क्रिकेटबद्दल खूप प्रामाणिक आहे. हे मला फार रिलेटही झालं आणि त्याला मैदानावरचा प्रत्यक्ष क्षण एन्जॉय करायचा असतो. म्हणजे त्याला म्हणतात ना की बॉलरपेक्षा तर तूच जास्त सेलिब्रेट करतो. कारण खरंच त्याला तितका आनंद झालेला असतो. तो क्षण टू द कोअर जगतो. मी असं कोणाला बघितलेलं नाही. माझ्यासाठी तो प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अनुष्काही चांगली आहे तशी(हसतच)."
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या रुचिरा स्टार प्रवाह वाहनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत लावण्या हे खलनायिकी पात्र साकारत आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.