ब्रेकअपनंतर मराठी अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात; हातातील अंगठी दाखवत दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:02 IST2025-12-27T09:02:28+5:302025-12-27T09:02:59+5:30
मराठी अभिनेत्रीने फोटोमध्ये बॉयफ्रेंडचीही झलकही शेअर केली आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करताच सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे

ब्रेकअपनंतर मराठी अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात; हातातील अंगठी दाखवत दिली प्रेमाची कबुली
सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्रींनी लग्न केलं आहे. पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, भाग्यश्री न्हालवे अशा अनेक अभिनेत्रींची अलीकडेच लग्न झाली. अशातच आणखी एक मराठी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री आहे रेवती लेले. रेवतीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन प्रेमाची कबुली दिली आहे. जाणून घ्या सविस्तर
रेवतीने फ्लॉन्ट केली प्रपोज रिंग
रेवतीने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन रेवती लिहिते, मी होकार द्यायच्या आधीच माझ्या हृदयाने होकार दिला, अशा खास शब्दांमध्ये रेवतीने कॅप्शन लिहून प्रेमाची कबुली दिली आहे. रेवतीने हातात नाजूक अशी अंगठी परिधान केली असून तिच्या हातात फुलांचा गुच्छ दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये रेवतीच्या बॉयफ्रेंडची झलकही बघायला मिळतेय.
रेवतीने ही गुड न्यूज देतात सर्वांनी तिचं अभिनंदन करुन कौतुक केलं आहे. रेवतीचे चाहते आणि तिचे इंडस्ट्रीतील मित्र मैत्रिणी आनंदी असून सर्वांनी रेवतीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रेवती याआधी अभिनेता आदिश वैद्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु दोघांचं ब्रेकअप झालं. आता ब्रेकअपनंतर रेवती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. रेवतीचा होणारा बॉयफ्रेंड कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. रेवतीला आपण 'स्वामिनी', 'लग्नाची बेडी' या मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलं.