ऑफस्क्रीन मायलेकींची धमाल; दीपिका-कार्तिकीसह दीपाने फॉलो केला Makeba ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 19:14 IST2023-07-07T19:14:05+5:302023-07-07T19:14:23+5:30
Reshma shinde: रेश्मा अनेकदा तिच्या सहकलाकारांसोबत व्हायरल होणारे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करत असते.

ऑफस्क्रीन मायलेकींची धमाल; दीपिका-कार्तिकीसह दीपाने फॉलो केला Makeba ट्रेंड
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (Reshma shinde). 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून रेश्माने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज ती प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबातील एक भाग वाटते. रेश्मा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर घडणारे किस्से, प्रसंगी बऱ्याच वेळा ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
रेश्मा अनेकदा तिच्या सहकलाकारांसोबत व्हायरल होणारे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करत असते. यावेळीदेखील त्यांनी असाच एक ट्रेंड फॉलो केला आहे. रेश्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत तिच्या दोन लेकी कार्तिकी आणि दीपिका दिसत आहेत. तसंच श्वेतादेखील त्यांना साथ देत आहे.
व्हायरल होत असलेल्या या चौघींनी makeba हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहे. विशेष म्हणजे पडद्यावरील या कलाकारांची पडद्यामागे असलेली मैत्री पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.