तोंडाला स्कार्फ बांधून मराठमोळ्या अभिनेत्रीचा ट्रेनने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणते - लोक मला विचारतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:39 AM2024-01-24T11:39:12+5:302024-01-24T11:39:45+5:30

मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून मराठी अभिनेत्रीचा लोकलने प्रवास, म्हणाली...

marathi actress priya marathe travel by ac train to avoid mumbai traffic shared video | तोंडाला स्कार्फ बांधून मराठमोळ्या अभिनेत्रीचा ट्रेनने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणते - लोक मला विचारतात की...

तोंडाला स्कार्फ बांधून मराठमोळ्या अभिनेत्रीचा ट्रेनने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणते - लोक मला विचारतात की...

बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटींचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, प्रार्थनास्थळी कलाकार दिसले की त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. त्यामुळेच अनेकदा कलाकार ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अनेक कलाकार मुंबईतील ट्राफिकला कंटाळून शूटिंगच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी मुंबई लोकलचा पर्याय निवडतात. मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिनेदेखील नुकताच मुंबई लोकलने प्रवास केला. तोंडाला स्कार्फ बांधून प्रियाने मुंबईच्या एसी लोकलमधून केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ट्रेन प्रवासाचा अनुभवही सांगितला आहे. "लोक मला विचारतात की तुम्ही लोकलने प्रवास करता का? त्यांना मी सांगते हो. मी कधी कधी ट्रेनने प्रवास करते. कारण, मुंबईचं ट्राफिक टाळण्याचा हा चांगला पर्याय आहे. आणि त्यात एसी ट्रेन म्हणजे जस्ट लाइक अ वॉव! आणि मी असा प्रवास करते," असं कॅप्शन प्रियाने या व्हिडिओला दिलं आहे. 

प्रियाच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. प्रियाने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'पवित्रा रिश्ता' या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. याबरोबरच तिने अनेक हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

Web Title: marathi actress priya marathe travel by ac train to avoid mumbai traffic shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.