१० वर्षांनी 'ती' पुन्हा येतेय! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'या' मालिकेत घेतली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:20 IST2025-10-15T11:11:23+5:302025-10-15T11:20:35+5:30
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं टीव्हीवर दमदार कमबॅक! 'या' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

१० वर्षांनी 'ती' पुन्हा येतेय! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'या' मालिकेत घेतली एन्ट्री
Kajalmaya Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या २७ ऑक्टोबरपासून काळजमाया ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हॉरर कथेचा अनुभव देणाऱ्या या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. स्वार्थी अन् निर्दयी चेटकणीची कथा मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान,या मालिकेसंदर्भात एक महत्त्वाची महिती समोर आली आहे. काजळमाया मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने एन्ट्री झाली आहे. जवळपास १० वर्षांनी प्रेक्षकांची लाडकी नायिका छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे.
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने काजळमाया मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. "जरी कोणी आले तुझा वेध घ्याया…" असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रिया बेर्डेंची झलक पाहायला मिळते आहे. या प्रोमोमध्ये त्यांचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतो आहे.
आपल्या सहज, सुंदर अभिनयाच्या मराठीसह हिंदी चित्रपटसृ्ष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे काजळमायातून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्या एका महत्त्वपू्र्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. कनकदत्ता असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे. कनकदत्ता ही चेटकीण पर्णिकाची आई आहे.सुड भावना असणारी, आपल्या लेकीच्या राक्षसी महत्वाकांक्षेला खत पाणी घातले. या मालिकेच्या माध्यमातून प्रिया बेर्डेंनी जवळपास १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे चाहते प्रचंड खुश आहेत.