प्राजक्ता माळीला धड चालताही येईना; १२ किलोचा घागरा घातल्यामुळे झाले हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:13 PM2023-11-26T14:13:34+5:302023-11-26T14:14:14+5:30

Prajaktta Mali: अलिकडेच प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या डिझायनर घागऱ्यामध्ये छान फोटोशूट केलं होतं. पण या घागऱ्यामुळेच तिचे हाल झाले.

marathi actress Prajaktta Mali share her lehanga story | प्राजक्ता माळीला धड चालताही येईना; १२ किलोचा घागरा घातल्यामुळे झाले हाल

प्राजक्ता माळीला धड चालताही येईना; १२ किलोचा घागरा घातल्यामुळे झाले हाल


मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री, व्यावसायिका, उद्योजिका अशा वेगवेगळ्या नावाने आज ती ओळखली जाते. प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच तिने अनेक क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये वरचेवर तिची चर्चा रंगत असते. यात प्राजक्तादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर तिच्या जीवनातील काही किस्सेही ती शेअर करत असते.

अलिकडेच प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या डिझायनर घागऱ्यामध्ये छान फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोंची नेटकऱ्यांनी स्तुतीही केली. मात्र, फोटोत छान दिसणाऱ्या प्राजक्ताला या घागऱ्यात नीट चालणंही कठीण झालं होतं. एका पोस्टच्या माध्यमातून तिने तिचे झालेले हाल सांगितले आहेत.

प्राजक्ताने पुन्हा या घागऱ्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच या हेवी ड्रेसमुळे तिला कसा त्रास झाला हे कॅप्शनमध्ये सांगितलं. 

नैनों से नैना जो मिला के देखे..
मौसम के साथ मुस्कुरा के देखे
दुनिया उसी की है जो आगे देखे..
मूड मूड के ना देख मूड मूड के…।
(मूड मूड के सोडा.. समोर बघूनही नीट चालता येत नव्हतं, हा घागरा तब्बल १०-१२ किलोंचा होता .पण होता सुंदर.), असं कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, प्राजक्ताचा हा घागरा तब्बल १० ते १२ किलो वजनाचा होता. त्यामुळे एवढ्या वजनदार ड्रेसमध्ये चालताना तिला अवघड झालं होतं. मात्र, तरीदेखील तिने उत्तमरित्या तो कॅरी केला.

Web Title: marathi actress Prajaktta Mali share her lehanga story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.