'नवा गडी नवं राज्य'मध्ये पल्लवी पाटील साकारणार आनंदी, या भूमिकेबद्दल ती म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:10 IST2022-08-01T16:01:41+5:302022-08-01T16:10:53+5:30

पल्लवी पाटील हिच्या करीयरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

Marathi actress Pallavi Patil will play Anandi in Nava Gadi Nava Rajya serial | 'नवा गडी नवं राज्य'मध्ये पल्लवी पाटील साकारणार आनंदी, या भूमिकेबद्दल ती म्हणाली...

'नवा गडी नवं राज्य'मध्ये पल्लवी पाटील साकारणार आनंदी, या भूमिकेबद्दल ती म्हणाली...

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून तिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो सादर करण्यात आला आहे.

पल्लवी पाटील हिच्या करीयरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. पल्लवी आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदाच टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी आनंदीला पाहिलं आणि या भूमिकेतून देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करायला सूरवात केली आहे. 

या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार असून, अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. छोट्या पडद्यावरचा हा पहिला प्रवास पल्लवीसाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे आणि आनंदीच पात्र निभवायला ती खूप उत्साहित आहे.

आनंदीची भूमिका एक नव्या धाटणीची आहे त्या बद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, “मी साकारत असलेल्या आनंदीच पात्र गावातून आलेली स्वच्छंद स्वभावाची मुलगी आहे. तिच्या आजूबाजूच्या लोकांना ती आवडते आणि आनंद पसरवणारी आनंदी आहे.  तिच्या नवऱ्याचा अर्धवट राहिला संसार कशा रीतीने पुरा करेल आणि हे होत असताना  त्यात रमा कशी तिला डिवचणार आहे हे पाहिला मिळेल.  त्या दोघांचा मजेशिर आमना सामना पाहताना प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे. ही प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल ,रमा आणि आनंदीच्या जुगलबंदित आनंदी ही  एक आई , एक सून , एक पत्नी अशी नाती निभवून रमाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे बघणं प्रेक्षकांना खात्रीने आवडेल.

Web Title: Marathi actress Pallavi Patil will play Anandi in Nava Gadi Nava Rajya serial