"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:48 IST2025-04-27T13:43:34+5:302025-04-27T13:48:11+5:30
"मराठी माणसांचं दैवत...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री नयना आपटेंनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंबद्दल जुनी आठवण

"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..."
Nayana Apte: अभिनेत्री नयना आपटे (Nayana Apte) या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे लोकप्रिय असणाऱ्या नयना आपटे यांनी वेगवेगळ्या मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या पााचव्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. अभिनयाचं बाळकडू त्यांना आई अभिनेत्री शांत आपटे यांच्याकडूनच मिळालं होतं. त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आठवणीतला किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच नयना आपटे यांनी 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय प्रवासासह बऱ्याच दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांची खास आठवण देखील शेअर केली. त्यावेळी या मुलाखतीमध्ये नयना आपटे म्हणाल्या, "आमच्या डोळ्यासमोर बाळासाहेब म्हणजे दैवत. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी मी मुद्यामहून शिवाजी पार्कला त्या गर्दीमध्ये जायची. त्यांची विनोदी शैली तसेच त्यांचे जे रोखठोक विचार होते ते मला खूप आवडायचे. त्यावेळी आमच्या घरची जी मंडळी होती असे आम्ही सगळे आवर्जून त्यांची भाषणे ऐकायला जायचो. म्हणजेच शिवसेनेचा दसरा मेळावा तो आमच्या डोळ्यासमोर आहे. लोकांची प्रचंड गर्दी आम्ही बघितली आहे. बाळासाहेबांवर अलौकिक प्रेम करणारी माणसं आम्ही बघितली आहेत. बाळासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ते मराठी माणसांचं दैवत होते. आज जर असते तर आपल्या कानावरती भाषेसंदर्भात ज्या गोष्टी येतात, ते घडलं नसतं. कधी कधी मी जेव्हा ऐकते की भाषेबद्दल जे वाद होतात. ते जेव्हा होताना मी बघते तेव्हा वाटतं असं काय चुकलंय ज्यामुळे माणसाच्या मनात असं का येतं असेल? भाषा आपली आहे. ज्या महाराष्ट्राने आपल्याला घर, व्यवसाय दिला. तिथे आपण असं कसं बोलू शकतो?. "
पुढे त्या म्हणाल्या, "बाळासाहेबांनी मराठी माणसाला अरेला कारे म्हणण्याची ताकद दिली. त्यांच्या शब्दांत ताकद होती. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासोबत बसलेले होते." असं म्हणत नयना आपटे यांची आपल्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केला.