जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, "मोर नाचरा.."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:12 PM2023-10-09T16:12:27+5:302023-10-09T16:13:20+5:30

आज तिने ट्रोलर्सला चपराक लगावणारा व्हिडिओ पोस्ट केला.

marathi actress Mitali Mayekar hillarious reply to comment on her post slammed trollers | जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, "मोर नाचरा.."

जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, "मोर नाचरा.."

googlenewsNext

मराठी अभिनेत्रींनी जरा कधी बोल्ड कपडे घातले की लगेच त्यांना ट्रोल करायला सुरुवात होते. प्रार्थना बेहेरे, मिताली मयेकर, श्रुती मराठे अशा अनेक अभिनेत्री यामुळे ट्रोल झाल्या आहेत. दरम्यान मितालीने अनेकदा ट्रोलर्सना सडेतोड उत्तरंही दिलं आहे. आजच मितालीची (Mitali Mayekar) एक पोस्ट व्हायरल होतीये ज्यामध्ये तिने ट्रोलर्सला चपराक लगावणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्याच्या कमेंटला मितालीचा रिप्लाय भन्नाटच आहे.

मराठी अभिनेत्रींनी बिकीनी सारखे कपडे घातले ती लगेच त्यांना मराठी संस्कृतीचा आरसा दाखवला जातो. काही दिवसांपूर्वी मितालीने बीचवर बिकीनीतील फोटो पोस्ट केले होते. यावरुन ती प्रचंड ट्रोल झाली. तर आज तिने ट्रोलर्सला चपराक लगावणारा व्हिडिओ पोस्ट केला. 'एरवी बीचवर कसे कपडे घातले जातात. याविरुद्ध महाराष्ट्रीयन लोकांना मराठी मुलींनी बीचवर कसे कपडे घालायला हवे असतात.' असं म्हणत तिने बीचवर काळी साडी घातलेला व्हिडिओ पोस्ट केला. 

या व्हिडिओवर एकाने कमेंटमध्ये लिहिले,'तू जरीकाठाची बिकीनी घे म्हणजे काही लोकांचे प्रॉब्लेम सुटतील.' यावर मिताली म्हणते,'बिकीनी वरती जरतारीचा मोर नाचरा हवा!'

मितालीची ही कमेंट चाहत्यांना भलतीच आवडली आहे. तसंच सतत कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकतंच अभिनेत्री बाली मध्ये सुट्ट्या एन्जॉय करुन आली. नवरा सिद्धार्थ चांदेकरसोबत ती आतापर्यंत अनेक ठिकाणी फिरुन आली आहे. त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.

Web Title: marathi actress Mitali Mayekar hillarious reply to comment on her post slammed trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.