मराठी अभिनेत्रीने रुग्णालयात साजरा केला वाढदिवस, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:20 IST2023-12-11T13:19:51+5:302023-12-11T13:20:53+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Marathi actress Megha Ghadge celebrated her birthday in hospital fans expressed concern | मराठी अभिनेत्रीने रुग्णालयात साजरा केला वाढदिवस, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

मराठी अभिनेत्रीने रुग्णालयात साजरा केला वाढदिवस, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

'बिग बॉस मराठी 4' फेम मराठी अभिनेत्री मेघा घाडगेने (Megha Ghadge) काल वाढदिवस साजरा केला. मात्र वाढदिवशी तिने केलेली पोस्ट पाहून चाहते चिंतेत पडलेत. मेघा रुग्णालयात अॅडमिट असून तिथेच तिने केक कट करतानाचे फोटो पोस्ट केलेत. यामध्ये तिच्यासोबत तिचं कुटुंब दिसत आहे. मेघाला नक्की झालंय काय हे मात्र तिने या पोस्टमधून कळू दिलेलं नाही. 

मेघा घाडगेने काल वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमधून ती रुग्णालयात असल्याचे स्पष्ट झाले. तरी चेहऱ्यावर गोड हसू ठेवत तिने केक कट केला. त्याचे फोटोही शेअर केले.  या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले, 'मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद!' मेघासोबत तिची आई, भाऊ असं कुटुंब दिसत आहे.

मेघाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिला रुग्णालयात असलेलं पाहून काय झालंय? अशी कमेंट करत काळजी व्यक्त केली आहे. तसेच लवकरात लवकर बरी हो अशी प्रार्थनाही चाहत्यांनी केली आहे.

मेघा घाडगे लावणी डान्सर म्हणून लोकप्रिय होती. गेल्या २० वर्षांपासून ती लावणी नृत्य करत आहे. यासोबतच तिने 2004 साली आलेल्या 'पछाडलेला' या गाजलेल्या मराठी सिनेमातून पदार्पण केलं.तिने काही मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. नुकतीच ती मराठी बिग बॉस 4 मध्ये सहभागी झाली होती.

Web Title: Marathi actress Megha Ghadge celebrated her birthday in hospital fans expressed concern