"आई कुठे काय करते नंतर ब्रेक घेतला, कारण...", मधुराणी प्रभुलकरने स्पष्टच सांगितलं, म्हणाली- "पाच वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:49 IST2025-11-20T12:44:39+5:302025-11-20T12:49:50+5:30
मधुराणी प्रभुलकरने सांगितलं 'आई कुठे काय करते' नंतर ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाली...

"आई कुठे काय करते नंतर ब्रेक घेतला, कारण...", मधुराणी प्रभुलकरने स्पष्टच सांगितलं, म्हणाली- "पाच वर्ष..."
Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते'ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका आहे. या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. या मालिकेतील तिची अरुंधती ही भूमिका चांगलीच गाजली. जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. लवकरच ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिच्या अनुभवांविषयी कथन केलं.
नुकतीच मधुराणी प्रभुलकरने 'कलाकृती मीडिया'ला मुलाखत दिली. त्यावेळी 'आई कुठे काय नंतर' मधुराणी मधल्या काळात एका मोठ्या भूमिकेच्या प्रतिक्षेत होती का? की कोणत्या चित्रपटाची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यादरम्यान, मधुराणी म्हणाली, "आई कुठे काय करते पाच वर्ष चालल्यामुळे थोडा ब्रेक घ्यायचा होता. दरम्यान, मी स्वत ला रिफ्रेश करण्यासाठी एक वेगळा काहीतरी अनुभव घेण्यासाठी मी ज्याचा त्याचा विठ्ठल नावाचं नाटक केलं. त्या नाटकाने मला खूप काही दिलं. आतून ढवळून काढलंय असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मी आताच एक चित्रपट केला, जो लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळेल."
मग मधुराणी पुढे म्हणाली,"आई कुठे काय करते मालिकेनंतर काय ही चर्चा आमच्यात अधून मधून व्हायची. त्यानंतर मला थोडीशी विश्रांती हवी होती. मग काही महिन्यानंतर मल फोन आला आणि मग मी म्हटलं की हे करूयात...", अशा भावना मधुराणीने मुलाखतीत व्यक्त केल्या.