'स्वरालीला दोन दादा मिळाले'; मधुराणीच्या कुटुंबात झाला नव्या सदस्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 07:03 PM2023-05-28T19:03:22+5:302023-05-28T19:04:17+5:30

Madhurani gokhale-prabhulkar: सध्या मधुराणीने मालिकेतून लहानसा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे.

marathi actress madhurani gokhale prabhulkar share special for sydney friend | 'स्वरालीला दोन दादा मिळाले'; मधुराणीच्या कुटुंबात झाला नव्या सदस्यांचा समावेश

'स्वरालीला दोन दादा मिळाले'; मधुराणीच्या कुटुंबात झाला नव्या सदस्यांचा समावेश

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर(Madhurani gokhale-prabhulkar). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत मधुराणी, अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. त्यामुळे आज घराघरात ती लोकप्रिय झाली आहे. सध्या मधुराणीने या मालिकेतून लहानसा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे. विशेष म्हणजे ही ट्रीप ज्या व्यक्तींमुळे शक्य झाली त्यांचे तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून आभार मानले आहेत. तसंच स्वरालीला दोन दादा मिळाले असंही तिने म्हटलं आहे.

"गेली ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. ७/८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २/३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा.सोपं नव्हतं, नाहीये.... long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो...गेल्या ३ वर्षात सलग असे ८/१० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप सारा ताण असतो.माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिप ची ही संधी चालून आली", असं मधुराणी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला 'मी तुझ्या 'कवितेचं पान' चा मोठा फॅन आहे...इथे काही कवी आहेत...तुझा एपिसोड इथे करता येईल का ? 'मी म्हंटलं, ' मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते' त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं... 'आई... 'च्या टीम ने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीच ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली. आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे... उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव. आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर ह्यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली, खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो... त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं... सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वराली ला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा...!!"
 

Web Title: marathi actress madhurani gokhale prabhulkar share special for sydney friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.