Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:42 IST2023-04-16T15:42:02+5:302023-04-16T15:42:44+5:30
Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका लोकप्रिय होण्यामागचं एक कारण म्हणजे अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर. या मालिकेत अरुंधती ही मुख्य भूमिका साकारुन मधुराणीने महिलावर्गात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. एक सर्वसामान्य गृहिणी ते एक गायिका असा अरुंधतीचा प्रवास अनेक महिलांना आपलासा वाटतो. त्यामुळेच ही मालिका आज लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकारही तितकाच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर अरुंधतीचा मोठा चाहतावर्ग असून ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
अरुंधती म्हणजे मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यातील बऱ्याचश्या घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने लेकीसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतच एक छान कॅप्शन दिलं आहे.
मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या लेकीच्या केसांना छान तेल लावून देत आहे. सोबतच माझं रोज रात्रीचं आवडतं रुटीन, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. त्यामुळे मधुराणी न चुकता रोज आपल्या लेकीची तेल मालिश करते हे यातून लक्षात येतं.
दरम्यान, मधुराणीचं तिच्या मुलीवर प्रचंड प्रेम असून तिच्या प्रत्येक पोस्टमधून हे प्रेम नेटकऱ्यांना पाहायला मिळतं. यापूर्वीही तिने तिच्या लेकीसोबतचे काही डान्स व्हिडीओ, ट्रेंडिंग व्हिडीओ शेअर केले आहेत.