मेकअपशिवाय कशा दिसतात वहिनीसाहेब?; धनश्री काडगांवकरचा नो मेकअप लूक पहिल्यांदाच आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:13 AM2024-02-15T11:13:05+5:302024-02-15T11:13:36+5:30

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने पहिल्यांदाच तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिचा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

marathi actress dhanashri kadgaonkar no makeup look photo | मेकअपशिवाय कशा दिसतात वहिनीसाहेब?; धनश्री काडगांवकरचा नो मेकअप लूक पहिल्यांदाच आला समोर

मेकअपशिवाय कशा दिसतात वहिनीसाहेब?; धनश्री काडगांवकरचा नो मेकअप लूक पहिल्यांदाच आला समोर

छोट्या पडद्यावर कधी वहिनीसाहेब तर कधी शिल्पी होऊन राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (dhanashri kadgaonkar). आजवर उत्तम अभिनयाच्या जोरावर धनश्रीने अपार लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. धनश्री सुद्धा कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

कलाकार मंडळी म्हटलं की प्रेक्षक कायम त्यांना मेकअपमध्ये किंवा एखाद्या छान गेटअपमध्ये पाहतात. त्यामुळे चेहऱ्यावरील या रंगपट्टीमागे ही कलाकार मंडळी नेमकी कशी दिसतात हे कोणीही फारसं पाहात नाही. परंतु, धनश्रीने त्यामुळेच मेकअपशिवाय ती कशी दिसते हे चाहत्यांना दाखवलं आहे. धनश्रीने तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे धनश्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने कोणताही मेकअप केलेला नाही. किंवा, डिझायनर कपडेही परिधान केलेले नाहीत. मात्र, तरी सुद्धा ती अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यामुळे पडद्यावर सुरेख दिसणारी धनश्री खऱ्या आयुष्यातही तितकीच छान दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनश्रीने तिचे नो मेकअप लूकमधील ३ फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या चर्चेत येत आहे. अलिकडेच धनश्री 'तू चाल पुढं' या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने शिल्पी ही ग्रे शेड असलेली भूमिका साकारली होती.

Web Title: marathi actress dhanashri kadgaonkar no makeup look photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.