"डीजेवर नाचतात आणि...", शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:50 IST2025-06-04T10:47:54+5:302025-06-04T10:50:52+5:30

शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज कळलेच नाहीत..."

marathi actress ashvini mahangade expresses her strong opinion on shiv jayanti celebration says  | "डीजेवर नाचतात आणि...", शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज..."

"डीजेवर नाचतात आणि...", शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- "लोकांना महाराज..."

Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली अनघा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण झाला. दरम्यान, अश्विनी महांगडे तिच्या कामासह स्पष्टवक्तेपणसाठी ओळखली जाते. अशातच आता अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने केलेल्या एका वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 

अलिकडेच अश्विनी महांगडेने मराठी मनोरंजन विश्व या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान, ती म्हणाली,"शिवजयंतीला जो शिवज्योत पेटवून गडावरून त्याच्या गावापर्यंत आणत असेल त्यासाठी खूप ताकद लागते. त्यामुळे मला असं वाटतं, एखादा माणूस हा विचार करून जो पूर्ण तयारी करून घराबाहेर निघत असेल तर त्याने एक टक्का तिथेच जिंकलं आहे. पण ही गोष्ट बाजूला ठेवली तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डीजे आणि त्यावर नाचणं. खरंतर, या लोकांना महाराज कळलेच नाहीत. बऱ्याच अशा सामाजिक संस्था आहेत; ज्या शिवजयंतीला इतर लोकांना मदत करायला जास्त प्राधान्य देतात. शिवाय त्यापेक्षा जास्तीने गुणाकार केला तर इतकी माणसं आहेत, जे डीजेवर नाचतात आणि अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करतात. पण, त्यांना हे मी इथे बसून सांगितलं की, बाळांनो असं करायचं नाही? तर ते काय माझं ऐकणार नाहीत. पण, मला असं वाटतं शिवजयंती साजरी करायला आपण तेव्हाच लायक होऊ, जेव्हा महाराजांचे विचार आत्मसात करु."

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी असं नाही म्हणत की, एक पुस्तक वाचा आणि त्यातले महाराजांचे हजारो विचार आत्मसात करा. तर ते नाही होऊ शकत. महाराजांचे सोपे आणि साधे विचार आहेत, जे आपल्याला साधारणपणे शिकवले गेले आहेत. परस्त्रीचा मातेसमान, बहिणीसमान आदर केला पाहिजे ही छोटीशी गोष्ट आहे पण ती शिकणं गरजेचं आहे आणि ते आपल्यात असायलाच पाहिजे. अलिकडेच मी रीलवर एक व्हिडीओ बघितला, ज्यामध्ये डीजेवर लहान मुलं नाचत होती आणि घाणेरडे हावभाव करत होते. ती मुलं वयाने खूप लहान होती जर इथूनच सुरुवात होत असेल; तर मग आपण त्यांना कसं सांगणार की तुम्ही महाराज वाचा. त्यांना सांगण्याआधी त्यांच्या आई-वडिलांना सांगणं गरजेचं आहे." असं म्हणत अश्विनी महांगडेने आपलं व्यक्त केलं आहे. 

Web Title: marathi actress ashvini mahangade expresses her strong opinion on shiv jayanti celebration says