ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 17:04 IST2024-08-15T17:02:21+5:302024-08-15T17:04:46+5:30

ऐश्वर्या नारकर यांनी सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवर तामिळ गाण्यावर भन्नाट डान्स केलाय (aishwarya narkar)

marathi actress Aishwarya Narkar dance with bangali look water pocket song raayan movie | ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच

ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच

ऐश्वर्या नारकर या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमा, नाटकांमधून अभिनय केलाय. ऐश्वर्या यांच्या वयाची पन्नाशी उलटली असली तरीही त्या एकदम फिट अँड फाईन पाहायला मिळतात. ऐश्वर्या या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करत आहेत. या मालिकेच्या शूटींगमधून वेळात वेळ काढून ऐश्वर्या रील व्हिडीओ करत असतात. ऐश्वर्या यांचा असाच नवीन डान्स रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात त्यांनी बंगाली साडी नेसून तामिळ गाण्यावर डान्स केलाय.

ऐश्वर्या यांचा तामिळ गाण्यावर भन्नाट डान्स

ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ शेअर केलाय.  या व्हिडीओत ऐश्वर्या यांनी बंगाली साडी परिधान केलेली दिसतेय. बंगाली साडी नेसून ऐश्वर्या यांनी सुंदर डान्स केलेला दिसतोय. धनुषचा जो 'रायन' सिनेमा गाजतोय त्या सिनेमातील 'वॉटर पॉकेट' या गाण्यावर ऐश्वर्या यांनी हा सुंदर डान्स केलेला दिसतोय. ऐश्वर्या यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे.


ऐश्वर्या यांचं मालिकेत नवं रुप

ऐश्वर्या यांचा हा नवा लूक सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचकाच्या भूमिकेत होत्या. या मालिकेत विरोचकाचा अंत झाल्यानंतर आता याच मालिकेत ऐश्वर्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. विरोचकानंतर आता या मालिकेत त्या मैथिली हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहेत. मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 
 

Web Title: marathi actress Aishwarya Narkar dance with bangali look water pocket song raayan movie