'तुम्हाला लग्नानंतर कोणी प्रपोज केलंय का?' चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 10:51 IST2024-06-04T10:50:56+5:302024-06-04T10:51:21+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं.

Marathi Actress Aishwarya Narkar answered the fans question about whether someone proposed to her after marriage | 'तुम्हाला लग्नानंतर कोणी प्रपोज केलंय का?' चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर, म्हणाल्या...

'तुम्हाला लग्नानंतर कोणी प्रपोज केलंय का?' चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर, म्हणाल्या...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. अभिनय, सौंदर्य आणि फिटनेस या तिन्ही बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना तोड नाही. सोशल मीडियावर त्या कायम आपले फोटो शेअर करत असतात.  सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात.

नुकतच त्यांनी सोशल मीडियावरुन "आस्क मी एनिथिंग" हे सेशन घेतलं. त्यामध्ये अनेकांनी त्यांना बरेच प्रश्न विचारलं. यातच एका चाहत्याने त्यांना भन्नाट प्रश्न केला. 'लग्नानंतर कुणी प्रपोज केलं आहे का? ज्यांना माहित नसेल की तुमचं लग्न झालेलं आहे' असं एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांना विचारलं. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तरात म्हटलं की, 'सगळ्यांना माहितेय'. अर्थात  सगळ्यांना माहितेय की त्यांचं लग्न झालं आहे.   सध्या त्यांच्या या उत्तराची बरीच चर्चा सुरु आहे. 

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत 'रुपाली राज्याध्यक्ष' हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे.
 

Web Title: Marathi Actress Aishwarya Narkar answered the fans question about whether someone proposed to her after marriage