आजोबांनी घातला अमृता-प्रसादच्या केळवणाचा घाट, उखाणाही ठरतोय खास; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 12:40 PM2023-09-03T12:40:18+5:302023-09-03T12:41:45+5:30

पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची लगीनघटिका समीप आली आहे.

marathi actors prasad jawade and amruta deshmukh first kelvan program before marriage | आजोबांनी घातला अमृता-प्रसादच्या केळवणाचा घाट, उखाणाही ठरतोय खास; Video व्हायरल

आजोबांनी घातला अमृता-प्रसादच्या केळवणाचा घाट, उखाणाही ठरतोय खास; Video व्हायरल

googlenewsNext

मराठीतील सध्याचं चर्चेतलं कपल म्हणजेच प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh). बिग बॉसमध्ये दोघांची एकमेकांशी ओळख झाली. आता हे नातं लग्नापर्यंत येऊन पोहोचलं आहे. मागच्याच महिन्यात दोघांचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा पार पडला. तर आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अमृताच्या आजोबांनी अमृता आणि प्रसादसाठी केळवण आयोजित केलं होतं. यावेळी या गोड जोडीने घेतलेला उखाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची लगीनघटिका समीप आली आहे. त्यामुळे आता हळहळू केळवणालाही सुरुवात झाली आहे. अमृताच्या आईचे बाबा म्हणजेच आजोबांनी नातीसाठी पहिल्या केळवणाचा घाट घातला. यावेळी अमृताने पिवळसर पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर प्रसादने फिक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघंही सोबत खूप गोड दिसत होते. केळवणानंतर त्यांनी कुटुंबासोबत छान फोटोशूटही केलं. त्याचा व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या 87व्व्या वर्षी सगळं planning करून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली..एवढं सगळं झाल्यावर मग "उखाणा घ्या" ह्या ऑर्डर ला नाकारणार कसं' असं कॅप्शन अमृताने व्हिडिओला दिलं आहे.

१८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद यांच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.  मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित असतील अशी शक्यता आहे. ही जोडी सध्या चाहत्यांची लाडकी बनली आहे. त्याच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष असतं. पहिल्या केळवणाचा व्हिडिओही सध्या खूपच व्हायरल होतोय.

Web Title: marathi actors prasad jawade and amruta deshmukh first kelvan program before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.