"उपाध्येंना ज्या अटेंशनची सवय लागली आहे...", मराठी अभिनेत्याने घेतली निलेश साबळेची बाजू, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:33 IST2025-07-04T14:30:03+5:302025-07-04T14:33:09+5:30
"दहा वर्षे मनात राग साठवून...", शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर मराठी अभिनेत्याची पोस्ट

"उपाध्येंना ज्या अटेंशनची सवय लागली आहे...", मराठी अभिनेत्याने घेतली निलेश साबळेची बाजू, म्हणाला...
Swapnil Rajshekhar Post : सध्या मराठी कलाविश्वात निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यातील शाब्दिक वादाची चर्चा आहे. गेल्या १० वर्षांपासून निलेश साबळेने (Nilesh Sable) 'चला हवा येऊ द्या' च्या शोचं सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. मात्र, आता नव्या सीझनचं अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. याचदरम्यान, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली, असं म्हटलं होतं. याप्रकरणी आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच या वादावर एका मराठी अभिनेत्याने लिहिलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
नुकतीच सोशल मीडियावर मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट लिहून निलेश साबळेच्या बाजूने मत मांडलं आहे. स्वप्नील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, "या प्रकरणात, उपाध्येना ज्या पध्दतीच्या अटेंशनची सवय वर्षानुवर्षे लागली असेल तसं आणि त्या प्रमाणात अटेंशन झी च्या त्या सेटअप मधे न मिळणं… हे सुध्दा या सगळ्याचं मूळ असु शकेल… ‘हवा येऊ द्या’ हा वर्षानुवर्षे निलेश साबळेचा बराचसा एकखांबी तंबु राहिला आहे लेखन दिग्दर्शन सुत्रसंचालन अशा त्यातल्या महत्वाच्या क्रिएटिव्ह बाजू एकत्रीत संभाळताना. त्यातल्या अभिनेत्याना तालीम आणि सादरीकरण हे काम असतं… त्यामुळे कदाचित त्यांना शुटींग दरम्यान रिकामा वेळ मिळु शकेल."
पुढे त्यांनी लिहिलंय, "पण लेखक दिग्दर्शक आणि सुत्रसंचालक.. म्हणजे एकाअर्थी त्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असणाऱ्या निलेश साबळेला तितका फावला वेळ सेटवर मिळण्याची आणि त्याने सतत हसऱ्या चेहऱ्याने ऑफ़स्क्रीन सर्वाना अटेंड करत वावरत असण्याची अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. त्याला टेंशन किती असेल याची कल्पना कुणालाही करता येऊ शकते. पण उपाध्येना या माध्यमाची माहिती आणि सवय नसल्याने, ते स्वतः सहसा एकपात्री सादरीकरणात असल्याने त्यांची गफलत झालेली असावी."
शरद उपाध्ये आणि निलेश साबळे वादावर केलं भाष्य...
"तरीही, दहा वर्षे मनात राग साठवून रहाणे आणि तो असा जाहिर व्यक्त करणे हे उपाध्येंसारख्या वयोवृद्धाकडुन मुळीच अपेक्षीत नाही. शिवाय समजा, खरच जर उपाध्येंचा समज झाला तसं निलेश साबळेला वगळून तो कार्यक्रम सुरु होत असता, (जे खरं नाही हे निलेशनी आपल्या विडीयोतुन सांगातलं आहेच) तर ते निलेश साबळेसाठी आनंदाचं नक्की नसतं. अशावेळी ‘बरं झालं, डच्चु दिला’ वगैरे पध्दतीने व्यक्त होणं हे सभ्यतेला धरुनही नव्हे! तस्मात माझ्या मते, उपाध्येंचा राशीयोग या दोन तीन दिवसात काही बरा नव्हता!". अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.