आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:29 PM2024-04-21T16:29:50+5:302024-04-21T16:30:13+5:30

सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेत शुभंकर आणि अमृता यांची जोडी होती. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.

marathi actor Shubhankar Ekbote got married to Amruta Bane in pune watch videos | आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का?

आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का?

छोट्या पडद्यावरील ऑनस्क्रीन कपल शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) आणि अमृता बने (Amruta Bane) खऱ्या आयुष्यात नवरा बायको झाले आहेत. आजच दोघांनी आयुष्यभराची गाठ बांधली. पुण्यात थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेत शुभंकर आणि अमृता यांची जोडी होती. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.

शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या लग्नाचा थाट अगदी राजेशाही होता. शुभंकर पेशवा लूकमध्ये तयार झाला होता. पांढरा कुर्ता, जांभळा पायजमा, डोक्यावर जांभळा बाजीराव पेशवे स्टाईल पुणेरी पगडी असा त्याचा लूक होता. तर अमृता जांभळ्या-गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत अतिशय सुंदर दिसत होती. कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अगदी आनंदात आणि राजेशाही थाटात विवाह संपन्न झाला. त्यांच्या सप्तपदीचे आणि लग्नाचे सुंदर व्हिडिओ बघा.लग्नानंतर काही वेळातच त्यांचं रिसेप्शनही झालं. रिसेप्शनसाठी दोघांनी खास साऊथ इंडियन लूक केला होता. पांढऱ्या धोतीमध्ये सुभंकर अगदी साऊथ हिरोसारखाच दिसत होता. तर सिल्क साडी, सोन्याचे दागिने या लूकमध्ये अमृताने लक्ष वेधलं.

शुभंकर आणि अमृता यांना आशीर्वाद देण्यासाठी मराठी कलाकारांनीही हजेरी लावली. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अभिनेते प्रविण तरडेसह अनेक कलाकार आले. शुभंकर एकबोटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो चिठ्ठी, मंत्र, डार्कलाईट, कन्यादान , चौक, धर्मवीर अशा चित्रपट मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. तर अमृता बनेबद्दल सांगायचं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात न्यूज रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रंग माझा वेगळा, जय जय स्वामी समर्थ, कन्यादान या मालिकांमध्ये काम केलं.

Web Title: marathi actor Shubhankar Ekbote got married to Amruta Bane in pune watch videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.