स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

By देवेंद्र जाधव | Updated: May 31, 2025 15:59 IST2025-05-31T15:58:32+5:302025-05-31T15:59:18+5:30

मराठी कलाकार कुटुंबाला म्हाडाचं घर लागलं असून अभिनेत्याच्या लेकीने भावुक पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

Marathi actor shrikant desai and acttress rupali desai wins MHADA lottery house | स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्यासाठी प्रत्येकाला मोठा संघर्ष आणि मेहनत करावी लागते. एका मराठी अभिनेत्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंय. याचाच अर्थ, मराठी अभिनेत्याला म्हाडाचं घर लागलंय. अभिनेत्याच्या लेकीने सोशल मीडियावर फोटो आणि कॅप्शन शेअर करत ही खास गोष्ट सर्वांना सांगितली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे श्रीकांत देसाई. श्रीकांत यांची पत्नी रुपाली देसाई सुद्धा अभिनेत्री असून त्या नृत्यांगनाही आहेत. श्रीकांत यांच्या लेकीने नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

श्रीकांत देसाईंना लागली म्हाडाची लॉटरी

श्रीकांत यांची मुलगी दिशा ही लोकप्रिय कथ्थक डान्सर आहे. दिशाने नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलंय की, "एका आर्टिस्टचं घर (म्हाडा) A government declared artist at this stage of life is a beautiful blessing... मेहनत म्हणजे काय हे मी त्या दोघांकडून शिकले आहे. एक सच्चा कलाकार कधीच थांबत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपली कला दिसत असते. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा कलाकार हा आपल्या कलेमुळे जिवंत राहतो. मला आठवतय जेव्हा बाबा ICU मध्ये होते तेव्हा सुद्धा आईने तिचं कलेचं कार्य थांबवलं नाही. बाबांनी सुद्धा तिला ते थांबवू दिला नाही."


"तेव्हा मला त्यांच्या आयुष्यातील कलेची किंमत जाणवली. आपल्या कलेवरची निस्सीम भक्ती त्या दोघांचीही आहे. आणि त्यामुळे मी जे काही आहे हे फक्त त्या दोघांमुळे. दोघांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या constant प्रोत्साहनामुळे.. माझ्या स्वप्नांना मोठा करायला जेवढी मी मेहनत घेतेय तेवढेच ते ही घेतायत.. एका कलाकार कुटुंबात जन्म झाल्याचा आणि कलाकार असल्याचा मला खूप अभिमान आहे." श्रीकांत यांनी 'रुद्रम' सारख्या मराठी मालिकेत काम केलंय.

Web Title: Marathi actor shrikant desai and acttress rupali desai wins MHADA lottery house