'तुझं मंगळसूत्र विकून माझ्यासाठी..'; आईच्या वाढदिवशी मराठमोळ्या अभिनेत्याचा भावूक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 08:46 AM2024-05-25T08:46:11+5:302024-05-25T08:46:28+5:30

लेकरांसाठी आई काय काय करते याचं उदाहरण म्हणजे संकेतने लिहिलेली पोस्ट. तुम्हीही वाचा (sanket korlekar)

Marathi actor sanket korlekar emotional revelation on mother birthday | 'तुझं मंगळसूत्र विकून माझ्यासाठी..'; आईच्या वाढदिवशी मराठमोळ्या अभिनेत्याचा भावूक खुलासा

'तुझं मंगळसूत्र विकून माझ्यासाठी..'; आईच्या वाढदिवशी मराठमोळ्या अभिनेत्याचा भावूक खुलासा

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकेत कोरलेकर. संकेतने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अजूनही बरसात आहे अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. संकेत सध्या रील स्टार सुद्धा झालाय. सोशल मीडियावर संकेतचे रील्स चांगलेच व्हायरल होत असतात. अशातच संकेतने आज त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहून मोठा खुलासा केलाय. 

संकेतची आईसाठी खास पोस्ट

संकेतने त्याच्या आईसोबतचे खास क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन लिहिलंय की, "आई आज तुझा वाढदिवस..गेल्या १० वर्षात तुझ्यावरचं प्रेम १००० पट झालंय.त्या आधी तुला मी देव समजेन इतके प्रेम नव्हते कारण तू केलेल्या त्यागाची किंमत कळण्याइतपत लायकी नव्हती माझी. मला नोकरी करायची नव्हती छोट्याश्या गावातून येऊन अभिनेता बनायचं होतं पण चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून स्ट्रगल करण्यासाठी माझा दुसरा छंद एडीटींग आणि रेकॉर्डिंग मधून पैसे कमवण्यासाठी तू मला न विचारता तुझं मंगळसूत्र विकलस आणि मला लॅपटॉप घेऊन दिलास."

संकेतच्या स्वप्नांसाठी आईनेही नोकरी केली

संकेत पुढे लिहितो, "मुंबईत राहायला खायला पैसे नव्हते म्हणून भाड्याचा खोलीचे पैसे कमविण्यासाठी पप्पांसोबत तू पण दोन हजार पगाराची पार्ट टाइम नोकरी पकडलीस पण कधीच म्हणाली नाहीस की संकेत इतकी वर्ष झाली तुझं काहीच घडत नाहीये तू अभिनयाचा नाद सोड आणि परत ये गावला नोकरी कर म्हणून. मी रडत खडत का होईना पण युनिवर्स सोबत एकाच गोष्टीसाठी भांडत होतो की ***** आत्ता माझ्यासाठी नाही माझ्या आई साठी मला यशस्वी कर आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही आहे. माझ्या फॅमिली शिवाय माझं जगणंच व्यर्थ आहे. आई.. तुझ्यावरचं हे प्रेम हा आदर मी मरेपर्यंत कायम असेल. माझ्या आईने माझ्यासाठी जे जे केलय ते मलाच माहित आहे. त्यामुळे आईसाठी.. काहीही करेन... काहीही. आई तू १०० वर्ष निरोगी आणि धडधाकट जग. वाढदिवसाच्या शुभेच्छा. "

Web Title: Marathi actor sanket korlekar emotional revelation on mother birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.