Video: सागर कारंडेचा वाढदिवस बसमध्येच झाला साजरा, नाटकातील सहकलाकरांनी दिलं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:59 PM2024-01-02T16:59:07+5:302024-01-02T17:00:14+5:30

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला सागर कारंडेचा वाढदिवस असतो.

marathi actor Saagar Karande celebrated birthday with cast and crew of his natak | Video: सागर कारंडेचा वाढदिवस बसमध्येच झाला साजरा, नाटकातील सहकलाकरांनी दिलं सरप्राईज

Video: सागर कारंडेचा वाढदिवस बसमध्येच झाला साजरा, नाटकातील सहकलाकरांनी दिलं सरप्राईज

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कलाकार सागर कारंडे (Saagar Karande) टीव्हीवर दिसत नसला तरी तो नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचे तो प्रयोग करत आहे. दरम्यान काल सागरचा वाढदिवस नाटकातील कलाकारांसोबतच दणक्यात साजरा झाला. तेही नाटकाच्या बसमध्येच केक कट करत त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला सागर कारंडेचा वाढदिवस असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सागरने वाढदिवसाचं सेलिब्रेशन काम करतच केलं. 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या त्याच्या नाटकाची संपूर्ण कास्ट आणि क्रू बसने दौऱ्याला निघाली असता बसमध्येच वाढदिवसाचा केक कट करण्यात आला. सागर म्हणाला,'मला फार बरं वाटतंय की मी नाटकाच्या बसमध्ये आहे. नाटकाची सगळी मंडळी कलाकार, बॅकस्टेज, ड्रायव्हरपासून सगळेच इथे आहेत. माझी नेहमीच अशी इच्छा असते की मी वाढदिवसाला तुमच्यासगळ्यांबरोबर असावं. माझे घरचे वाट बघत आहेत पण ठीके त्यांनी कधीच तक्रार केली नाही. तुम्ही सोबत आहात आपण एन्जॉय करतोय यातच सगळं आलं.'

यावेळी सागरसोबत त्याची संपूर्ण नाटक मंडळी होती. शलाका पवार, उमेश जगताप, ऋतुजा कुलकर्णी, ओंकार शिर्के, कल्याणी बागवालेसह सर्वच हजर होते. सागर सध्या 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसत नसल्याने प्रेक्षक त्याची कायम आठवण काढतात. पण तो लवकरच आगामी सिनेमांमध्येही दिसणार आहे. 

Web Title: marathi actor Saagar Karande celebrated birthday with cast and crew of his natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.