"एकट्याला सगळं सांभाळणं जड जातंय...", वडिलांच्या आठवणीत मराठी अभिनेता भावुक, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:56 IST2025-12-31T12:55:07+5:302025-12-31T12:56:45+5:30
प्रसादने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. वडिलांच्या आठवणीत प्रसाद भावुक झाला आहे. त्यांच्यासाठी त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

"एकट्याला सगळं सांभाळणं जड जातंय...", वडिलांच्या आठवणीत मराठी अभिनेता भावुक, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता प्रसाद लिमये चाहत्यांचा लाडका आहे. प्रसाद सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स देत असतो. सध्या प्रसादने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. वडिलांच्या आठवणीत प्रसाद भावुक झाला आहे. त्यांच्यासाठी त्याने खास पोस्ट लिहिली आहे.
प्रसादने इन्स्टाग्रामवरुन वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रसाद आणि त्याचे वडील दिसत आहे. "बाबा आज तुम्हाला शेवटचं भेटून १३ वर्ष झाली...!! बाबा काय लिहू तुमच्याबद्दल.. रोज वाटतं तुम्ही जर माझ्याबरोबर असता तर कदाचित मी अजून काहीतरी करू शकलो असतो आयुष्यात... एकट्याला खूप अवघड जातं हो सगळं सांभाळणं. आत्ता मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे.. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द अजूनही माझ्या कानात आहे. मी कधीही तुमचं नाव आणि तुमची मान खाली जाईल असं काही करणार नाही हा माझा शब्द आहे", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
प्रसाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'तू जिवाला गुंतवावे', 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. याशिवाय 'बेधडक', 'मोगरा फुलला', 'व्हॉट्स अप लग्न', 'दगडी चाळ २' या सिनेमांत तो झळकला आहे. 'फत्तेशिकस्त' सिनेमात त्याने ऐतिहासिक भूमिका साकारली होती.