Prarthana Behere : तुझ्या पोटात दुखतंय का?... प्रार्थना बेहरेचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत; 'ते' हावभाव चाहत्यांना खटकले, काहींनी स्पष्टच सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:30 IST2023-01-02T17:29:03+5:302023-01-02T17:30:19+5:30

Prarthana Behere : होय, प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रार्थनाचा तो व्हिडिओ आणि तसले हावभाव पाहून शेवटी नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे...

marathi actor Prarthana Behere bold video viral fans trolled | Prarthana Behere : तुझ्या पोटात दुखतंय का?... प्रार्थना बेहरेचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत; 'ते' हावभाव चाहत्यांना खटकले, काहींनी स्पष्टच सुनावले!

Prarthana Behere : तुझ्या पोटात दुखतंय का?... प्रार्थना बेहरेचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत; 'ते' हावभाव चाहत्यांना खटकले, काहींनी स्पष्टच सुनावले!

 ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी प्रार्थना बेहरे (Prarthana Behere ) ही सर्वांची आवडती अभिनेत्री. सोशल मीडियावरचे तिचे फोटो, व्हिडीओ, रिल्स क्षणात व्हायरल होतात, ते त्यामुळेच. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असलेल्या मराठी सेलिब्रिटींच्या यादीत प्रार्थनाचं नावही आहेच. सध्या तिचीच चर्चा आहे. होय, प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रार्थनाचा तो व्हिडिओ आणि तसले हावभाव पाहून शेवटी नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. 

होय, प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थना कातिल पोझ देताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. कमेंट बॉक्समधील कमेंट्सबद्दल तर विचारू नका. चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी यावरून प्रार्थनाला ट्रोल केलंय तर काहींनी तिची मजा घेतली आहे. 

नक्की काय होतंय? असा मजेशीर प्रश्न एका युजरने विचारला आहे. काय झालं मळमळतंय का? पोटात दुखतंय का? अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. बास्स की आता, किती बटरफ्लाय उडवणार? अशी कमेंटही एकाने केली आहे. तिच्या ड्रेसमध्ये झुरळ घुसला आहे, अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे. 

एका चाहत्याने प्रार्थनाच्या हातावर कोरलेल्या टॅटूवरही कमेंट केली आहे. ‘त्या हातावर कोरलेल्या पाळीव प्राण्यांना खायला काय देता?’, असं त्याने कमेंट करताना म्हटलंय. काहींनी यावरून प्रार्थनाला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. ही अंकिता लोखंडेची कॉपी करतेय, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकाने, ‘किती छान महाराष्ट्रीयन संस्कार,’ म्हणत तिला ट्रोल केलं आहे.
    

Web Title: marathi actor Prarthana Behere bold video viral fans trolled