अभिनंदन! 'दुनियादारी' फेम प्रणव रावराणेने घेतलं हक्काचं घर, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री
By देवेंद्र जाधव | Updated: July 31, 2025 10:56 IST2025-07-31T10:56:23+5:302025-07-31T10:56:47+5:30
दुनियादारी सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रणव रावराणेने हक्काचं घर घेतलं आहे. प्रणवची पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री आहे

अभिनंदन! 'दुनियादारी' फेम प्रणव रावराणेने घेतलं हक्काचं घर, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री
'हास्यसम्राट'चा विजेता आणि विविध कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता प्रणव रावराणेने नवीन घर घेतलं आहे. प्रणवची बायको अमृता सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय केला आहे. दोघांनी ठाण्यात स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. प्रणव आणि अमृताने सोशल मीडियावर गृहशांतीचे फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नवीन घर घेतल्याबद्दल दोघांचं अभिनंदन केलंय.
प्रणव-अमृताचं नवीन घर
प्रणव - अमृताने त्यांच्या इन्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून नवीन घरात गृहशांती करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अमृताने 'सातव्या मुलीचा सातवी मुलगी' मालिकेत अभिनय केल्याने या मालिकेतील तिची सहकलाकार श्वेता मेहंदळे सुद्धा दोघांचं अभिनंदन करण्यासाठी उत्सुक होती. प्रणवृ-अमृता गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यामुळे संघर्षाच्या काळानंतर या दोघांनी हक्काचं घर घेतल्याने प्रणव-अमृता स्वप्नपूर्तीचा आनंद घेत आहेत.
प्रणवृ-अमृताचं वर्कफ्रंट
प्रणव रावराणे हा मराठी टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय कलाकार. प्रणवला आपण 'दुनियादारी' सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. या सिनेमातील सॉरीच्या भूमिकेमुळे प्रणवला खूप लोकप्रियता मिळाली. प्रणव विविध कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करताना दिसतो. तर प्रणवची बायको अमृताही प्रसिद्ध अभिनेत्री. मुलीच्या जन्मानंतर अमृताने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. परंतु 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करुन तिने कमबॅक केलं. दोघांनी नवं घर घेतल्यानिमित्त त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.