"मित्रांनी हजारो रुपये बुडवले तरीही...", कुशल बद्रिकेने दिग्दर्शक विजू मानेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:24 IST2023-07-26T12:18:44+5:302023-07-26T12:24:48+5:30

कुशलने दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोबतच त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Marathi actor kushal badrike written a post for his friend and director Viju Mane on social media | "मित्रांनी हजारो रुपये बुडवले तरीही...", कुशल बद्रिकेने दिग्दर्शक विजू मानेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

"मित्रांनी हजारो रुपये बुडवले तरीही...", कुशल बद्रिकेने दिग्दर्शक विजू मानेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

मैत्रीचं नातं प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतं. मग तो सर्व सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रेटी. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी हक्काचा मित्र किंवा मैत्रीण असतंच. अशाच मराठी इंडस्ट्रीतील एका खास मित्रांबद्दल सांगणार आहोत. उत्तम अभिनयशैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike).आजवरच्या कारकिर्दीत कुशलने प्रेक्षकांचं कमालीचं मनोरंजन केलं आहे.

कुशलने काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र, यात बऱ्याचदा त्याच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आल्या. कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. कुशलने मराठी सिनेसृष्टीतील त्याच्या बेस्ट असणाऱ्या अभिनेता आणि दिग्दर्शकासाठी ही पोस्ट लिहिली आहे. आज विजू माने यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुशलनं व्हिडीओ शेअर करत लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेयं.

कुशलची पोस्ट 
रम्मीच्या डावात 13 पानातली 7 पानं जोकर्स आणि 6 इतर असा विश्वविक्रम करुन स्वतःलाच आश्चर्यात पडणारे, मित्रांनी अडचणीच्या वेळी घेतलेले हजारो रुपये बुडवले तरीही मैत्रीत काही न बोलणारे पण कधीतरी गम्मत म्हणून पत्ते खेळताना चुकून 150/200 रुपये जिंकलेच तर ते मात्र बुडता कामा नये असे तत्वनिष्ठ, Struggler sala ह्या आमच्या वेबसिरीजसाठी आमच्या डेट्स एकत्र मिळाव्या ह्या साठी गेली अनेक वर्ष स्ट्रगल करणारे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता या पलीकडे जाऊन “जेवणात ताक आणि मनात कायम बायकोचा धाक” अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे. आणि संडे फॅमिलीसाठी राखून ठेवणारे.

विजू दादा तुम्हाला happy birthday. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विजू माने यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Marathi actor kushal badrike written a post for his friend and director Viju Mane on social media