फोटोग्राफरच्या प्रेमात पडला अन् उरकून टाकलं, मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान; लग्नाचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:26 IST2025-01-27T11:25:59+5:302025-01-27T11:26:25+5:30

रेश्मा शिंदे, अभिषेक राहाळकर, शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे.

marathi actor devesh kale tied knot with celebrity photographer sarika bhagane see photos | फोटोग्राफरच्या प्रेमात पडला अन् उरकून टाकलं, मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान; लग्नाचे फोटो पाहा

फोटोग्राफरच्या प्रेमात पडला अन् उरकून टाकलं, मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान; लग्नाचे फोटो पाहा

गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नाचा बार उडवून दिला आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. रेश्मा शिंदे, अभिषेक राहाळकर, शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता देवेश काळेचं शुभमंगल सावधान झालं आहे. 

'कन्यादान' फेम अभिनेता देवेश काळेने सेलिब्रिटी फोटोग्राफर असलेल्या सारिका भगणे हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांचे लग्नाचे फोटो समोर आले आहेत. देवेश आणि सारिका यांनी लग्नासाठी पारंपरिक पेहराव केला होता. काही दिवसांपूर्वीच देवेशने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यांच्या प्रीवेडिंग फोटोशूटचीही प्रचंड चर्चा रंगली होती. आता लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 


देवेशने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'प्रेम पॉयजन पंगा', 'मानसीचा चित्रकार तो', 'जय मल्हार', 'कन्यादान' या मालिकांमध्ये तो दिसला. तसेच 'पुष्पक विमान', 'बांबू' या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. देवेश आणि सारिका लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  

Web Title: marathi actor devesh kale tied knot with celebrity photographer sarika bhagane see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.